Parali municipality helps wine shop vendors | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर
रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजिनामा
अहमदनगर निकाल - भाजप - 14, शिवसेना - 22, राष्ट्रवादी - 20, कॉंग्रेस - 5, बसप - 4, सपा - 1, अपक्ष - 2
मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्ट परिसरात हल्ला
ब्रम्हपुरी नगरपरिषद- नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. रिताताई दीपक उराडे यांचा ८०२० मतांनी विजय
रिसोड नगरपरिषद - नगराध्यक्ष पदी जन विकास आघाडीच्या विजयमाला आसनकर विजयी
लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 13 जागी भाजप विजयी, नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार विजयी, काँग्रेस चार जागी विजयी

दारू दुकाने वाचवण्यासाठी परळी नगरपालिका सरसावली

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांची सत्ता असलेल्या परळी नगरपालिकेने देखील दारु विक्रेत्यांना  वाचवण्यासाठी पाऊल उचलले आहे. 

बीड:  दारु विक्रेत्यांसाठी मोठ्या शहरातील महापालिका राज्य व राष्ट्रीय महामार्ग रस्ते आपल्याकडे घेण्यासाठी जीवाचे रान करत असतांना त्यात आता परळी नगरपालिकेची देखील भर पडली आहे. 

विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी नगरपालिकेने शहर व परिसरातून जाणारे दोन राज्य रस्ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करून त्यांचा
राज्यमार्ग दर्जा काढून घ्यावा असा प्रस्ताव शासनाकडे दिला होता.

विशेष म्हणजे सरकारने देखील या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देत 5  किलोमीटरच्या या दोन्ही रस्त्यांचा राज्यमार्ग दर्जा काढून टाकत अवर्गीकृत केले आहे. त्यामुळे आता या रस्त्यांवरील दारू दुकानांना अभय मिळणार आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांची सत्ता असलेल्या परळी नगरपालिकेने देखील दारु विक्रेत्यांना  वाचवण्यासाठी पाऊल उचलले.

परळी पालिकेने दिलेल्या प्रस्तावानुसार व अधीक्षक  अभियंत्यांच्या अहवाला आधारे राज्य सरकारने परळी परिसरातून जाणारे खर्डा - परळी (राज्य मार्ग क्र.64 ) व खामगाव -बर्दापूर ( राज्य मार्ग क्र . 221 ) या दोन रस्त्यांची परळी शहर परिसरातील अनुक्रमे 4.40 आणि 1.50 किलोमीटरची साखळी
अवर्गीकृत करून त्याचा राज्यमार्गाचा दर्जा काढला आहे.

आता या अवर्गीकृत रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची हमी नगर पालिकेने घतेली आहे. परळी शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अगोदरच वाईट असताना पालिकेने आणखी 5.90
किलोमीटरचा बोजा स्वतःच्या माथी केवळ केवळ दारू दुकानदारांचेच हित जोपासण्यासाठी मारून घेतल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यामंधून  उमटत आहेत.

संबंधित लेख