The Paradoxical Prime Minister-shashi-tharoor-new-book | Sarkarnama

शशी थरुरांच्या `The Paradoxical Prime Minister'मध्ये मोदींच्या निर्णयांची चिरफाड  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेले `द पॅरॉडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अॅण्ड हिज इंडिया' हे पुस्तक या महिनाअखेरीस वाचकांच्या भेटीस येत आहे. 

पुस्तकात मोदींच्या विरोधाभासी निर्णायांचा ऊहापोह करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट थरुर यांनी आज केले आहे. पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणा करण्यासाठी थरुर यांनी स्वतःची हटके स्टाईल वापरली आहे. ट्विट करताना 29 कॅरॅक्टर असलेल्या `floccinaucinihilipilification' (उच्चार - फ्लॉक्सीनॉसीनिहिलीफिकेशन, अर्थ- काडीमोल ठरवणारी कृती किंवा सवय) या शब्दाचा आधार घेत त्यांनी पुस्तकाची माहिती दिली आहे. 

पाच राज्यांतील मिनी लोकसभेच्या निवडणुकांपाठोपाठ लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चारशे पानांहून अधिक पाने असलेल्या या पुस्तकामुळे भाजप आणि कॉंग्रेसमध्ये बराच धुराळा उडणार, हे नक्की.  

`नरेंद्र मोदी हे एक विरोधाभासी व्यक्तिमत्त्व आहे. ते सांगतात एक आणि करतात दुसरेच' असे पुस्तकाच्या पृष्ठावर नमूद करीत, थरुर यांनी या पुस्तकांत मोदींच्या विरोधाभासी भूमिकांचा धांडोळा घेतल्याचे म्हटले आहे. 

संबंधित लेख