panvel muncipal election | Sarkarnama

पनवेलमध्ये शेकापचा हटके प्रचार 

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 14 मे 2017

मुंबई : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराला सुरवात झाली आहे. जो तो पक्ष प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरत आहेत. असाच अनोखा फंडा शेतकरी कामगार पक्षाने सुरू केल्याने चर्चेचा विषय बनला आहे. उमेदवाराच्या चिन्हांचा बॅंनेर पाठीवर घेवून कार्यकर्ते प्रचार करत आहेत. 

निवडणुक म्हणजे प्रचार आलाचं, "ताई माई आक्का विचार करा पक्का अन्‌ आमच्याच चिन्हावर मारा शिक्का" हा प्रचाराचा काळ मागे पडला आहे. डिजीटल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडत असतानाच सायकल, मोटर सायकल, कार, रिक्षा आदी वाहनांचा वापर करण्यात येत आहे. मात्र, पनवेल महापालिकेच्या निवडणुक प्रचारात कपबशी या चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या बॅंनेर पाठीवर घेवून कार्यकर्तेप्रचार करत आहेत.

प्रत्येक वार्ड, रस्ते, हाऊसिंग सोसायट्या आदी ठिकाणी हे पाठीवर बॅंनरधारी प्रचारक जात आहेत. कपबशी हे चिन्ह शेतकरी कामगार पक्षाचे निवडणुक चिन्ह आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी अनोखा फंडा शेकापने वापरला आहे. आज प्रर्यंत प्रचारासाठी अनेक वेगवेगळे फंडे वापरण्यात आले आहेत. मात्र पनवेल महापालिकेच्या प्रचारात शेतकरी कामगार पक्षाने नवीन पद्धतीने प्रचार सुरू केल्याने सगळीकडे चर्चेचा विषय झाला आहे. 

संबंधित लेख