Panvel, Bhivandi- Nijampur corporation election on 24 May | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव पालिकांच्या निवडणुका 24 मे रोजी

सरकारनामा न्यूज ब्युरो
बुधवार, 19 एप्रिल 2017

निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज सादर करणे ः 29 एप्रिल ते 6 मे
- अर्जांची छाननी- 8 मे
- उमेदवारी मागे घेण्याची मुदत - 11 मे
-निवडणूक चिन्हांचे वाटप- 12 मे
- उमेदवारांची अंतिम यादी- 12 मे
- मतदान- 24 मे (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
- मतमोजणी- 26 मे
 

मुंबई :  पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी 26 मे रोजी होईल. या पालिकांच्या क्षेत्रांत बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाली, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत केली.

सहारिया म्हणाले, नवनिर्मित पनवेल महापालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर पालिकेची मुदत 10 जूनला तर मालेगाव पालिकेची मुदत 14 जूनला संपत आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने 5 जानेवारीला प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी वापरली जाणार आहे. एकूण 64 प्रभागांतील 252 जागांसाठी निवडणुका होत असून इच्छूक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 29 एप्रिल ते 6 मेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. रविवारी (ता.30) उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील; मात्र 1 मे रोजी हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळीउपस्थित होते.

 

संबंधित लेख