Pankaja Munde says , for last four years one person is targetting me | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

पंकजा मुंडे म्हणाल्या , चार वर्षे झाली एकच व्यक्ती मला टार्गेट करीत आहे 

रामनाथ दवणे 
शुक्रवार, 8 मार्च 2019

मुंबई : " माझ्यावरचे सर्व  आरोप रबिश- गलथान  आहेत . अशा आरोपांना मला उत्तर द्यायची गरज नाही . माझा विभाग सक्षम आहे . माझ्या  विभागाने केलेला खुलासा पुरेसा आहे," अशा शब्दात ग्रामविकास आणि महिला - बालकल्याण खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत . 

पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्याने केलेल्या मोबाईल खरेदीत  मोठा भ्रष्टाचार झालेला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता . यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता पंकजा मुंडे म्हणाल्या , " आशा गलथान आरोपांना मला उत्तर द्यायचे नाही. माझा विभाग सक्षम आहे. गेली चार वर्षे इतकाच व्यक्ती माझ्या  खात्याच्या फाईलींची माहिती मागवतो आहे . त्या पाहून काहीतरी बनावट व खोटे पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला जातो . शेवटी त्यातून काहीच निष्पन्न होत नाही . माझा विभाग भ्रष्ट्राचाराने बरबटलेले आहे, अशी ओरड गेले चार वर्षे केवळ एकच व्यक्ती करत आहे.आता मला या प्रकारचा कंटाळा आलेला आहे .  माझ्या विभागाने याचे उत्तर दिले आहे.  हे माझ्यासाठी काही नवीन नाही. याचे उत्तर देणे मला आवश्यक वाटत नाही. माझ्याखात्याने कुठलाही निर्णय घेतला की, तो चुकीचा कसा आहे,ते सांगितले जात आहे. मात्र केंद्रीय निकषानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने  हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना जाणून बुजून मला टार्गेट केले जात आहे ."

संबंधित लेख