२६ मेला मुंडे साहेबांना शपथ घेताना झालेला आनंद आणि 3 जुनला ईश्वराने केलेली क्रूर थट्टा ...! पंकजा मुंडे

पंधरा वर्षांच्या संघर्षानंतर गोपीनाथ मुंडे यांनी २६ मे रोजी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती . तर ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत आकस्मित निधन झाले होते .
Pankaja-Munde-saluting-father's image
Pankaja-Munde-saluting-father's image

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला केंद्रात चार वर्षे पूर्ण होत असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांची पुन्हा एकदा आठवण झाली . 

आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी २६ मे  ते ३ जून या सात दिवसात अत्यानंद ते दुःखाचा डोंगर कोसळणे अशा परस्पर विरोधी प्रसंगांना कसे सामोरे जावे लागले याचे वर्णन केले आहे . पंधरा वर्षांच्या संघर्षानंतर गोपीनाथ मुंडे यांनी २६ मे रोजी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती . तर ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत आकस्मित निधन झाले होते . गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनाच्या दुःखातून पंकजा मुंडे सावरल्या असल्या तरी पित्याच्या  आठवणीने मुलीचे मन कसे हळवे आणि कासावीस होते हे त्यांच्या पुढील मनोगतातून स्पष्ट होते  . 

पंकजा मुंडे लिहितात , "मै गोपीनाथ मुंडे ईश्वर की शपथ लेता हू " तो आवाज तो विरोधकांना आदरयुक्त धाक आणि आपल्या माणसाला गोड व आश्वासक वाटणारा आवाज आता होणे नाही ..आज केंद्र सरकारची उपलब्धी साजरी करायचा दिवस...केंद्र सरकारला 4 वर्ष झाले याबद्दल सर्व देशात मोदींच्या सरकारचे अभिनंदन व कौतुक करायचा दिवस ! पण आम्हाला २६ मे  ते ३ जुन हा सप्ताह अनाकलनीय हुरहूर आणणारा आहे . 

त्यावेळचा मुंडे साहेबांना शपथ घेताना झालेला आनंद आणि 3 जुनला ईश्वराने केलेली क्रूर थट्टा या मधील हे 7 दिवस ! त्यातील आमचा 15 वर्षाच्या प्रतिक्षेनंतरचा २६ मे  रोजी साहेबांच्या शपथ विधीचा आनंद  आणि ३जुनला कोणालाही अंदाज न आलेल्या नियतीच्या आघातामुळे दुःखाने  भिजलेला दिवस !  3 जून .. !

या आनंद -दुःखात  दोलायमान  असे आम्ही कठीण मनःस्थितीमध्ये आहोत .. बाबा तुम्ही शपथ घेतली आम्ही निभावू , सामान्यांच्या उत्थानाची सेवेची ! आम्ही तुमच्यावर प्रेम करणारे सर्व तुमचा वसा चालवू .... दुःख मनात राहीलच पण ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालवू !!!!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com