पंकजा मुंडेंनी दिलेला शब्द पाळला !

तुम्ही काळजी करु नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या कार्यमुक्तीचा आदेश थांबूवन तुम्हाला दिलासा देईन ,असे आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडें यांनी आंदोलक शिक्षकांना भ्रमणध्वनीवरुन दिले होते.
Pankaja_Munde
Pankaja_Munde

बीड : अंतरजिल्हा बदलीने आलेल्या आणि बिंदुनामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २८० शिक्षकांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे दिलासा मिळाला  आहे.   या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले होते .  तुमच्या पाठीशी मी  असून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, असा शब्द पंकजा मुंडेंनी  त्यांना  दिला हेाता. तो शब्द खरा ठरवत शिक्षकांना कार्यमुक्त करु नये असे निर्देश ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी दिले. 

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २०१४ साली अंतरजिल्हा बदलीने साडेआठशेवर शिक्षक आले. मात्र, पदे रिक्त नसतानाही येथे रुजू करुन घेतल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. दरम्यान, बिंदुनामावलीत काही प्रवर्गांच्या शिक्षकांच्या नेमणूका इतर बिंदुंवर झाल्याचे मागासवर्ग कक्षाच्या तपासणीत समोर आल्या. त्यावरुन हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ आणि मंत्रालयापर्यंत पोचले. 

दोन्हींकडूनच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी ता. १५ नावेंब्हर रोजी ३०२ अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर २८० शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेच्या अस्थापनेवरुन कार्यमुक्त करुन त्यांची सेवा संबंधीत जिल्हा परिषदांत प्रत्यावर्तीत केली होती. मात्र, चार वर्षे जिल्ह्यात नोकरी केल्यानंतर पुन्हा कुटूंबाशी फाटाफूट हा मुद्दा समोर आला . आणि पुन्हा संबंधीत जिल्हा परिषदेत गेल्यानंतर तिथे पद रिक्त असतील का ? आणि रुजू करुन घेतील का?  असा पेच या शिक्षकांसमोर होता. 

त्यामुळे कार्यमुक्तीचे आदेश मागे घ्यावेत, या मागणीसाठी शिक्षकांनी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटूंबियांसमवेत आंदोलन केले. आंदोलना दरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरुन शिक्षकांना दिलासा देण्याचा शब्द दिला होता. आपण पाठीशी असल्याचा धीर देत कार्यमुक्तीच्या आदेशाला थांबवू असा शब्द दिला होता. 

हा शब्द पाळत मंगळवारी त्यांच्या खात्याच्या सचिवांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या शिक्षकांना कार्यमुक्त करु नका असे निर्देश दिले आहे. पंकजा मुंडेंनी शब्द पाळल्याने पावणेतीनशे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला  आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com