Pankaja Munde joins devotional functional | Sarkarnama

पंकजा मुंडेंनी वाजवला  ढोल आणि धरला हरिनामाचा ठेका

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

परळी येथे डॉ. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या श्रावणमास तपोनुष्ठान निमित्त शनिवारी भव्य शोभा यात्रा निघाली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या पंकजा मुंडे यांनी ढोल वाजवून पथकाचा उत्साह वाढवला. 

बीड : राजकारणात असूनही मतावर ठाम राहणे, स्टाईलीश राजकारणी अशी ओळख निर्माण करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यातला नवा कलागुण समोर आला. त्यांनी चक्क ढोल वाजविण्याचा आनंद घेतला. टाळ मृदगांच्या निनादात आणि गुरुराज माऊली, हर हर महादेव च्या जयघोषात सहभागी भाविक महिलांच्या साथीने हरिनामाचा ठेका धरला.

परळी येथे डॉ. शिवालींग शिवाचार्य यांचे श्रावणमानसा निमित्त तपोनिष्ठुनान आयोजत केले आहे. या निमित्त निघालेल्या शोभायात्रेत सहभागी होत मंत्री पंकजा मुंडे यांनी ढोल वाजविण्याचाही आनंद घेतला. तत्पुर्वी त्यांनी हरीनाम सप्ताहातील किर्तनही श्रवण केले.

त्यानंतर त्या शोभायात्रेत सहभागी झाल्या. शोभायात्रेत महिलांचे ढोल पथक होते. टाळ मृदगांच्या निनादात आणि गुरुराज माऊली, हर हर महादेव च्या जयघोषात सहभागी भाविक महिलांच्या साथीने हरिनामाचा ठेका धरला. या मध्ये ढोल वाजवत महिला ढोल पथकाचा उत्साह वाढवला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख