pankaja munde grand entry | Sarkarnama

हेलिपॅड तयार : पंकजा मुंडेंची होणार "ग्रॅंड एंट्री'! 

सरकारनामा ब्युराे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

नगर : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केल्याप्रमाणे दसरा मेळावा शनिवारी सकाळी अकरा वाजता सुपे सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे होणार आहे. सावरगावमध्ये मेळाव्यासाठी वीस एकर जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहेत. पंकजाताईंसाठी खास हेलिपॅड तयार करण्यात असून त्यांचे हेलिकॉप्टर दुपारी 12.30 वाजता सावरगावमध्ये उतरणार आहे. 

दरम्यान, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सावरगावला भेट दिली. तेथील पाहणी करून मेळाव्याची जागा निश्‍चित करण्यात आली. सुमारे वीस एकरवर हे नियोजन करण्यात आले आहे. पार्किंग, पाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातून तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतून लोक येणार आहेत. पाथर्डी, शेवगाव तालुक्‍यातून एक लाखाच्यावर भाविक जातील, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली नाही, तरी बाबांच्या जन्मगावी सुपे सावरगाव येथील मेळावा आम्ही यशस्वी करून दाखवू. तेथील परिसराची पाहणी करून नियोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त मुंडे समर्थक व भगवानबाबांचे भक्त तेथे जाणार आहेत, असे गर्जे यांनी सांगितले. 

संबंधित लेख