pankaja munde and school | Sarkarnama

इच्छा तिथे मार्ग; पंकजा मुंडेंनी दिले, शाळा दुरुस्तीसाठी 25 कोटी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

बीड : जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न मर्यादीत आणि जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळण्यासही मर्यादा असल्याने अनेक दिवसांपासून शाळा खोल्या दुरुस्तींचा प्रश्न जटील बनला होता. मात्र, इच्छा तिथे मार्ग म्हणतात त्या प्रमाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या ग्रामविकास खात्याच्या 25/15 या हेडखाली दुरुस्तीसाठी 25 कोटी 20 लाख रुपये मंजूर केले. 

या निधीतून दोन हजार शाळा खोल्यांची दुरुस्ती होणार आहे. विशेष म्हणजे, ग्रामविकास विभागाचे 25/15 हे शीर्ष गावांतर्गत रस्ता, नाल्या, सभागृह या कामांसाठी आहे. मात्र, चांगल्या कामाची इच्छा असेल तर मार्ग निघतो त्याप्रमाणे आता हा मार्ग निघाला आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात अडीच हजार शाळा आहेत. मात्र, शाळा खोल्यांची अडचण आहे. नवीन खोल्या बांधण्यासाठी आणि काही बऱ्या असलेल्या खोल्यांच्या दुरुस्त्यांसाठी निधीची गरज होती. जिल्हा परिषदेचे उत्पन्न मर्यादीत असल्याने आणि जिल्हा नियोजन समितीमधून निधीच्या मर्यादा असल्याने येणाऱ्या अडचणींमुळे हा प्रश्न अधिकच जटील बनला होता. मात्र, आपल्या खात्याच्या 25/15 मधून ज्या प्रमाणे गावातील विकासासाठी निधी देतो तशा शाळा ह्या गावांची ज्ञानमंदिरे असल्याने रस्ते, नाल्या, सभागृहांऐवजी शाळांसाठीच निधी द्यावा, अशी कल्पना या खात्याच्या मंत्री आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सुचली. त्यांनी लागोलाग जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव मागवून घेतला आणि 25 कोटी 20 लाख रुपये मंजूर केले. यातून एक हजार 927 शाळा खोल्यांची दुरुस्ती होणार आहे. 

संबंधित लेख