pankaja munde and ram shinde | Sarkarnama

पंकजा मुंडे समर्थकांच्या नजरेत राम शिंदे ठरले व्हिलन 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

बीड : भगवानगडावर पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा घेऊ द्यायचा नाही यासाठी जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे यांना सरकारने बळ दिल्याची भावना पकंजा मुंडे समर्थक व वंजारा समाजाची झाल्याची चर्चा असून पंकजा यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न देखील राम शिंदे यांच्या माध्यमातून झाल्यालाचा आरोप पकंजा समर्थकांकडून केला जात आहे.

काल शनिवारी सावरगाव घाट येथील मेळाव्यात शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंकजा आणि खासदार प्रितम मुंडे यांनी आपल्या भाषणातून शिंदे यांचा भाऊ म्हणून केलेला उल्लेख देखील समर्थकांना रुचला नाही. 

पंकजा मुंडे राम शिंदे यांना भाऊ मानतात. परंतु पक्षनेतृत्वाने या भावाचा वापर करतच पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केल्याचे बोलेले जाते. पंकजा यांच्याकडे असलेले जलसंधारण खाते काढून घेऊन ते राम शिंदे यांना देण्यात आले होते. तेव्हा पासूनच पकंजा समर्थकांमध्ये शिंदे यांच्या विरोधात नाराजी होती. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शिंदे यांनी भगवान गडावरील मेळाव्याच्या बाबतीत बहीण पंकजा यांच्या बाजूने उभे राहण्या ऐवजी त्यांचा मेळावा गडावर कसा होणार नाही यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप पकंजा समर्थकांनी केला होता. 

सरकारचे पाठबळ मिळत असल्याने मग महंत नामदेव शास्त्री देखील भूमिकेवर अडून राहीले आणि त्यांनी पंकजा यांना गडावर वीस मिनिटे देखील देण्यास नकार दिला. पंकजा यांनी भगवान बाबाच्या कर्मभूमी ऐवजी जन्मभूमीची निवड करत यशस्वी मार्ग काढत मेळावा यशस्वीही केला. पण या सगळ्या प्रवासात पकंजा यांचे मानलेले भाऊ राज्यमंत्री राम शिंदे हे मात्र वंजारा समाज आणि पंकजा समर्थकांच्या दृष्टीने व्हिलन ठरले. 

शिंदेना भाऊ म्हणून नका 
शनिवारी सावरगावच्या मेळाव्यात राम शिंदे यांनी हजेरी लावली. पण त्यांच्या आगमानापासूनच मेळाव्याला आलेल्या समर्थकांमध्ये कूजबुज आणि शिंदे यांना उद्देशून शेरेबाजीला सुरुवात झाली होती. पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या भाषणात शिंदे यांचा भाऊ म्हणून उल्लेख केला तेव्हा उपस्थितांमधून त्यांना भाऊ म्हणू नका अशा घोषणा देण्यात आल्या. 

संबंधित लेख