pankaja munde and nagar | Sarkarnama

सत्तर वर्षांत ज्यांनी काही केले नाही ते आता हिशेब मागत आहेत : मुंडे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

नगर : हल्लाबोल आंदोलन हे विरोधकांचे नाटक होते. केवळ नाटकबाजी करून काहीही साध्य होणार नाही राष्ट्रवादीनेही जनतेला अडविले, फसविले. सत्तर वर्षांत काहीच न करणारे पाच वर्षांत हिशोब मागायला लागले, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. शिराळ चिचोंडी (ता. पाथर्डी) येथे रस्त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुंडे यांच्या हस्ते झाला. या वेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

मुंडे म्हणाल्या, घर नसल्याचे आणि धुराचे दुःख काय असते ते पंतप्रधान जाणतात. त्यामुळेच घरकुल आणि गॅस योजना सुरू केल्या. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चुली व्यवस्थित पेटू लागल्या आहेत. सामान्यांचे प्रश्न भाजपकडूनच सुटत आहेत, हे सर्वांना माहिती आहे. हल्लाबोल हे विरोधकांचे नाटक आहे. हल्लाबोल आंदोलन करून काय साध्य केले, ते सांगावे. भाजपने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे असे नाटकबाजी विरोधकांनी थांबवावी, असे मुंडे म्हणाल्या. 

अडवा जिरवा हे पाण्यासाठी 
मुंडे म्हणाल्या, अडवा - जिरवा हे पाण्यासाठी होते, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसने जनतेला अडविले व त्यांचीच जिरविली. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये. सत्तर वर्षांत काहीच न करणारे पाच वर्षांत हिशोब मागायला लागले. भाजपने मात्र जनतेला भरभरून दिले. 14 रस्ते 120 किलोमीटरसाठी 66 कोटी नगर, पाथर्डी, राहुरीला दिले. सर्वसामान्यांचा पैसा सर्वसामान्यांसाठीच खर्च केला. 

आमदार कर्डिले यांनी दिला शब्द 
प्रास्तविक भाषणात आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, मी भाजपमध्येच राहणार आहे. आपण राष्ट्रवादीत जाणार ही कुणीतरी अफवा पसरवली आहे. माझी निवृत्ती आता भाजपमधूनच होणार आहे, असा शब्द आमदार शिवाजी कर्डिले यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना आज दिला. भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे. आगामी काळात संपूर्ण जिल्हा भाजपमय झालेला दिसेल. आता सध्या तुमची लेक तुमच्यासमोर उभी आहे. तिला आशीर्वाद द्या.विकास कामांत तुम्हाला श्रीकृष्णाची भूमिका घ्यावी लागणार आहे असेही मुंडे म्हणाल्या. 
 
संबंधित लेख