pankaja munde and her father | Sarkarnama

माझ्या बाबतीत सर्वच अंदाज चुकत जाणार : पंकजा मुंडे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

बीड : मेळाव्याला जागा अपुरी पडल्याने कोणाला छतावर, कोणाला खिडक्‍यात उभारुन भाषण ऐकावे लागत आहे. जागेचा अंदाज आला नाही. मात्र, माझ्या बाबतीत सर्वच अंदाज चुकत जाणार असे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. दिवंगत गोपीनाथराव मुंडेंनंतर ही पोरगी काय करणार, मुलगी वारसा असते का, असे प्रश्न विचारले जात होते. पण, सर्वांचे अंदाज चुकले. दिवंगत मुंडेंनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या त्यांच्या मुलीला तुम्ही मायेच्या पदराआड घेतले असेही त्या म्हणाल्या. 

ऊसतोड मजूर, वाहतूकदार व मुकादमांच्या विविध प्रश्नांवर सुरु असलेल्या संपाच्या निमित्ताने शनिवारी मेळावा झाला. यामध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. या घटकाची साथ असल्यानेच माझ्या आवाजाला कोयत्याची धार आहे. दिवंगत मुंडेंच्या जागी साखर संघावर लवाद म्हणून मिळालेली नेमणूक हे माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे. यापुढे लाल दिवा व इतर पदे फिके आहेत. ऊन, वारा, वादळात संघर्ष करणाऱ्या ऊसतोड कामगारांसाठी आपणही ऊन, वारा व वादळाची तमा न बाळगता तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. 

ऊसतोड कामगारांनी दिवंगत मुंडेंच्यानंतर जी मला माया दिली त्याचे उपकार विसरता येणार नाहीत. तुमच्या पायाखाली कातडी अंथरली तरी उपकार फिटणार नाहीत असे पंकजा मुंडे म्हणाल्या. संघटनेच्या मागण्या न्याय असून त्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, आपणही कोयता घेऊन तुमच्या सोबत असू असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळ दसऱ्यापूर्वी कार्यान्वित होईल. मजूरांच्या घरकुल योजनेसाठी प्रयत्न करणार आहे. आगामी दसरा मेळावा सावगाव घाट (ता. पाटोदा) येथेच होणार आहे असे त्या म्हणाल्या. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, आर. टी. देशमुख, संगीता ठोंबरे, सविता गोल्हार, रमेश आडसकर, केशव आंधळे, श्रीमंत जायभाये, आदित्य सारडा, गोरक्ष रसाळ उपस्थित होते. 

दिवंगत मुंडे यांच्या स्टाईलमध्ये भाषणाची सुरुवात 
"मी पोचत नसले तरी माझा आवाज तुमच्या पर्यंत पोचतोय , पोचतोय का' असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हणताच उपस्थितांतून "हो... ' असा प्रतिसाद आला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभेत असेच म्हणायचे अशी आठवणही पंकजा मुंडे यांनी काढली. 
 
संबंधित लेख