pankaja munde and beed party worker | Sarkarnama

" लकी' ठरलेल्या घरी पंकजा मुंडे ; शिवसंग्रामच्या राजेंद्र मस्केंच्या गणपतीची आरती केली

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

बीड : शिवसंग्रामच्या राजेंद्र मस्के यांचा भाजपकडे वाढलेला ओढा, पंकजा मुंडे यांचे सूचक वक्तव्य आणि आवर्जुन मस्के यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती करण्याबरोबरच नाष्टा करणे या बाबींमुळे मस्के लवकरच भाजपमध्ये अशी चर्चा अधिकच जोर धरत आहे. मात्र, आता प्रवेशाचा मुहूर्त कधी आणि त्यानंतर मस्केंना भाजपमध्ये जागा कोणती एवढाच प्रश्न आहे. 

आमदार विनायक मेटे यांचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के यांची दोन महिन्यांपासून भाजपशी जवळीक वाढली. त्यात पंधरवाड्यापूर्वी मस्के यांनी आयोजित रस्ता उद्‌घाटन कार्यक्रम आणि त्यातील भाषणे पाहता मस्के यांच्या भाजप प्रवेशाच्या अटकळीला अधिकच बळकटी मिळाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. मात्र, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय डावपेचाने पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पानिपत झाले. विशेष म्हणजे पदाधिकारी निवडीपूर्वीच्या बैठका शिवसंग्रामच्या राजेंद्र मस्के मस्के यांच्या घरी झाल्या. येथेच सर्व डावपेच ठरले आणि राष्ट्रवादीचे पानिपत झाले. 

दरम्यान, पंधरवाड्यापूर्वी मस्केंच्या पुढाकाराने झालेल्या रस्ता उद्‌घाटन कार्यक्रमात "राजेंद्र मस्के यांचे घर आपल्यासाठी "लकी' आहे. यापुढेही आपल्याला या घरात येऊ द्यावे, राजकारणात नव्या पिढीला आपल्याला बळ द्यायचे आहे' असे सूचक वक्तव्य मुंडे यांनी केले होते. त्याचा प्रत्यय सोमवारी आला. बीडमध्ये आलेल्या पंकजा मुंडे यांनी मस्केंच्या घरी भेट देऊन त्यांच्या गणपतीची आरती केली. तसेच नाष्टाही केला. यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची गैरहजेरी आणि भाजप कार्यकर्त्यांची मांदीयाळी पाहता आता मस्केंच्या भाजपच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले. चांगले काम करणाऱ्याच्या आपण पाठीशी राहतो असे वक्तव्य करुन पंकजा मुंडेंनी पुन्हा "लवकर या' अशी साद राजेंद्र मस्केंना घातली. 

संबंधित लेख