pankaja munde and amerika | Sarkarnama

पंकजा मुंडेंमुळे तांड्यावरच्या महिलांना घडली अमेरिका फेरी...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

बीड : विमानाचा प्रवास सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांना हे शक्‍य असले तरी अमेरिकेसारख्या देशात जाणे व्हिसा, पासपोर्ट अशा किचकट कारणांनी स्वप्नच राहून जाते. पण, अगदी गाव - खेड्यातील आणि तांड्यावरच्या महिलांना विमानाने अमेरिकेची सफर आणि तिथल्या प्रतिथयश ठिकाणांना भेटी देण्याचे भाग्य लाभले. 

बीड : विमानाचा प्रवास सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीयांना हे शक्‍य असले तरी अमेरिकेसारख्या देशात जाणे व्हिसा, पासपोर्ट अशा किचकट कारणांनी स्वप्नच राहून जाते. पण, अगदी गाव - खेड्यातील आणि तांड्यावरच्या महिलांना विमानाने अमेरिकेची सफर आणि तिथल्या प्रतिथयश ठिकाणांना भेटी देण्याचे भाग्य लाभले. 

पंकजा मुंडे सांभाळत असलेल्या ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियान आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने मुंडे यांच्यासह त्यांच्या खात्याचे सचिव असीम गुप्ता, अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, फिक्कीचे रुबाब सूद यांच्यासह परळीजवळील वसंतनगर तांडा येथील विमल जाधव, राजश्री राडे, जळगाव जिल्ह्यातील अनिता सोनवणे, वर्धा जिल्ह्यातील संगिता गायकवाड या चार गाव - खेड्यातल्या आणि तांड्यावरच्या महिलांनाही अमेरिकेत जाता आले. 

केवळ विमानाची सैरच नाही तर दहा दिवसांच्या दौऱ्यात या चमुने फेसबुक मुख्यालय, हॉवर्ड विद्यापीठ, एमआयटी विद्यापीठ, न्युयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को येथील फेसबुक मुख्यालय, स्टॅंडफोर्ड शहरातील टिआयई व एमआयटी अशा प्रतिथयश संस्थांना भेटीही दिल्या. इंडियन ग्लोबल परिषद अशा प्रतिथयश कार्यक्रमांना हजेरीसह या ठिकाणांच्या मुख्यालयात प्रमुखांशी संवादही साधता आला. हा दौरा केवळ फिरण्यापुरताच मर्यादीत राहिला नाही तर त्यामुळे बचतगट चळवळीलाही बळ मिळणार आहे. 

या दौऱ्यात बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, विदर्भातील वारली हा चित्रकलेचे प्रकार, खाद्यपदार्थ तसेच तांबे धातूच्या बाटल्या, बंजारा समाजातील पारंपारिक हस्तकलेच्या कलाकुसरीचे पेहराव, हातमागावरच्या उत्पादनांचे विविध ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आले. वारली चित्रकलेला 7 हजार 200 रुपयांचा भाव मिळाला तर तांब्याच्या धातूच्या एका बाटलीला 2100 रुपये मिळाले. इंडियन ग्लोबल परिषदेला अमेरिकेत उपस्थित असलेल्या जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनाही या हस्तकलांनी भुरळ पाडली आणि त्यांनाही या वस्तू खरेदीचा मोह आवरला नाही. 

संबंधित लेख