अमेरिकेत जेव्हा पंकजा मुंडे गहिवरतात...! 

प्रवेशासाठी अर्ज केलेल्या जगातील केवळ 11 टक्के विद्यार्थ्यांनाच कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश मिळतो. त्यामध्ये यशःश्री मुंडे यांचा समावेश होता. शिवाय पदवीदान समारंभामध्येही त्यांचा "प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट' म्हणून गौरव करण्यात आला, ही देशासाठी अभिमानाची बाब मानता येईल. - पंकजा मुंडे
अमेरिकेत जेव्हा पंकजा मुंडे गहिवरतात...! 
अमेरिकेत जेव्हा पंकजा मुंडे गहिवरतात...! 

पुणे: राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या आई प्रज्ञा यांच्यासमवेत सद्या अमेरिकेत आहेत. छोटी बहीण यशःश्री हिच्या कौतुक सोहळ्याला उपस्थित असताना, ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा उल्लेख झाला, तेव्हा पंकजा यांना गहिवरून आले. ही माहिती स्वतः: पंकजा यांनी सोशल मिडीयावरुन दिली आहे. 

यश:श्री यांनी न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठात एलएलएम पदवी पूर्ण केली. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्यांचा "प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट' म्हणून गौरव करण्यात आला. कायद्याच्या अभ्यासासाठी कॉर्नेल विद्यापीठ हे जगातील पाच प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. "प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट' या गौरवासोबत यशःश्री यांना 250 अमेरिकन डॉलर्सची रक्कम देण्यात आली. मात्र ती रक्कम यशःश्री यांनी तेथील अनाथाश्रमाला दान केली. 

या सोहळ्याबद्दल पंकजा यांनी म्हटले आहे की, कॉर्नेल विद्यापीठाच्या सभागृहात जेव्हा "यशःश्री गोपीनाथराव मुंडे' हे नाव घेतलं तेव्हा गहिवरून आलं. मुलीने शिकून मोठं व्हावं, हीच मुंडे साहेबांची इच्छा होती. यशःश्रीने स्वबळावर या विद्यापीठात प्रवेश मिळवला. तिने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर स्वतःला सिद्ध करुन दाखवलं, याचा अभिमान आहे. आज बाबा असते तर त्यांनाही आपल्या लेकीचा खूप अभिमान वाटला असता. "मदर्स डे'च्या निमित्ताने तिने आईला एक प्रकारे भेटच दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com