pankaja munde about amit palve politics | Sarkarnama

अमित पालवेंना राजकारणात 'नो एंट्री', शिवाजी कर्डिलेंची मागणी फेटाळली! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला पालवेंना राजकारणात आणायचे नाही. माझं घर सांभाळण्याचे काम ते करतात. पालवे राजकारणात येत आहेत असं कोणत्या पक्षाला समजल तर माझ्याच घरात फूट पाडतील.' 

पाथर्डी (जि. नगर) : आमदार शिवाजी कर्डिले यांनी शिराळ चिचोंडी येथील कार्यक्रमात बोलताना अमित पालवे यांच्यावर नगरची राजकीय जबाबदारी सोपवा, अशी मागणी केली होती. हा धागा पकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, "मला पालवेंना राजकारणात आणायचे नाही. माझं घर सांभाळण्याचे काम ते करतात. पालवे राजकारणात येत आहेत असं कोणत्या पक्षाला समजल तर माझ्याच घरात फूट पाडतील.' 

चिचोंडी येथे मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी आज मुंडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड होते. पंकजा यांचे पति अमित पालवे, खासदार दिलीप गांधी,आमदार शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे,मोनिका राजळे,माजी आमदार बबन पाचपुते, सुभाष पाटील उपस्थीत होते. 

मुंडे म्हणाल्या, नेता व जनता एत्रत्रीत आले की लोकनेता तयार होत असतो. सत्तेच्या आभुषणाची गरज लोकनेत्याला कधीच भासत नाही. मला जनतेच्या भावना व विश्वास जपायचा आहे. मला स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या सारखं लोकनेता हेच पद मिळावायचं आहे. 

संबंधित लेख