pankaja mund and sangali corporation | Sarkarnama

पंकजा मुंडेंनी सांगलीत सभा घेतलेल्या प्रभागात सर्वच ठिकाणी भाजपचा विजय 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बीड : सांगली - मिरज - कुपवाडा महापालिका निवडणुकीत भाजपने इतिहास रचत मोठा विजय मिळविला आहे. या विजयात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी प्रचारसभा घेतलेल्या प्रभागांतील सर्वच नगरसेवक विजयी झाले. सांगली - मिरज - कुपवाडा महापालिका निवडणुकीचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपने इतिहास रचत यश मिळविले.

भाजपने 41 जागा जिंकल्या. या निकालाचे अन्वयार्थ लावणे सुरु झाले असून भाजपच्या विजयाचे आणि विरोधकांच्या पराभवांची चिकीत्सा सुरु झाली आहे. मात्र, भाजपच्या या घवघवीत यशात पंकजा मुंडे यांचाही मोलाचा वाटा आहे. 

या निवडणूकीत पंकजा मुंडे यांनी 27 जुलैला सांगलीचा दौरा करुन सांगलवाडी, विश्रामबाग आणि मिरज येथे शिवाजी चौक व जवाहर चौकात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा धेतल्या. त्यांच्या सभांनाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी सभा घेतलेल्या सांगलीवाडी व जवाहर चौक प्रभागात भाजपचे प्रत्येकी तीन - तीन तर विश्रामबाग व शिवाजी चौक प्रभागात प्रत्येकी चार - चार असे नगरसेवक विजयी झाले आहेत. 

संबंधित लेख