pankaj munde suppoter fir | Sarkarnama

पंकजा मुंडेंच्या 14 समर्थकांवर पुण्यात गुन्हा दाखल 

पांडुरंग सरोदे 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पुणे : राजकीय आरोप-प्रत्यारोपातून सोशल मिडीयाद्वारे पुणे शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकुर प्रसारीत केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या 14 समर्थकांवर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पुणे : राजकीय आरोप-प्रत्यारोपातून सोशल मिडीयाद्वारे पुणे शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकुर प्रसारीत केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या 14 समर्थकांवर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये सभा झाली होती. त्या सभेवरुन राष्ट्रवादी-भाजप समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यात पंकजा मुंडे यांनी थेट पवारांवर हल्ला केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडे यांना लक्ष्य केले होते. त्यात रुपाली चाकणकर यांनी "पवार साहेबांच्या सभेला झालेली गर्दी पाहून ताई गोंधळलात का ? थोडीसी चिक्की खा, पाणी प्या. मग बरे वाटेल' असा चिमटा मुंडे यांना काढला होता. 

फेसबुकवरील चाकणकर यांच्या पोस्टनंतर मुंडे समर्थकांनी चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकुर व्हायरल केला. तसेच वेगवेगळ्या पद्धतीने टिकाटिपण्णीही केली होती. या पार्श्‍वभुमीवर चाकणकर यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली होती. 

त्यानंतर सिंहगड पोलिसांनी 14 मुंडे समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामध्ये आसाराम सानप, सुनील एन.फड, मनोज मुंडे, पोपट फुंदे, सुशेन नागरगोजे, दादा कुटे, योगेश देवरे, ज्ञानदेव खेडकर, सॅम गदादे, शरद वाघ, महेश एन.एम. मुंडे, गणेश नागरे, श्रीकांत घोळवे, दिनेश मुंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करणे, बदनामी करणे या स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
 

 

 

संबंधित लेख