नांदगावच्या 92 गावांसाठी आमदार पंकज भुजबळ झाले भगीरथ ! 

दुष्काळ, टंचाई आणि नांदगाव यांचे अतुट नाते कित्येक दशकांचे आहे. पाऊस नाही. त्यामुळे मोठे धरण नाही. अशा दुष्टचक्रात टॅंकरच्या पाण्याने तहान भागवली जाते. हे दृष्टचक्र भेदण्यासाठी भगीरथ प्रयत्नातुन मतदारसंघातील 92 गावांना पाणी पुरवठा योजना पोहोचवण्यात आमदार पंकज भुजबळ यशस्वी झाले आहेत. उर्वरीत गावांचा पाणी प्रश्‍न लवकरच सोडवू, असा निर्धार 'सरकारनामा'शी बोलतांना आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केला.
नांदगावच्या 92 गावांसाठी आमदार पंकज भुजबळ झाले भगीरथ ! 

नांदगाव : दुष्काळ, टंचाई आणि नांदगाव यांचे अतुट नाते कित्येक दशकांचे आहे. पाऊस नाही. त्यामुळे मोठे धरण नाही. अशा दुष्टचक्रात टॅंकरच्या पाण्याने तहान भागवली जाते. हे दृष्टचक्र भेदण्यासाठी भगीरथ प्रयत्नातुन मतदारसंघातील 92 गावांना पाणी पुरवठा योजना पोहोचवण्यात आमदार पंकज भुजबळ यशस्वी झाले आहेत. उर्वरीत गावांचा पाणी प्रश्‍न लवकरच सोडवू, असा निर्धार 'सरकारनामा'शी बोलतांना आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केला. 

माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर प्रसिध्दीचा प्रकाशझोत नेहेमीच असतो. या सगळ्यांपासून अलिप्त, नम्र आणि मितभाषी सदस्य म्हणजे नांदगावचे आमदार पंकज भुजबळ. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ दुष्काळ, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने ग्रस्त आहे. हे चित्र बदलण्यासाठी गेली आठ वर्षे ते प्रयत्न करीत आहेत. त्याला चांगले यश देखील आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कृती आराखड्याद्वारे नांदगाव, मालेगावच्या छपन्न गावांची योजना त्यांनी मंजुरी मिळवली.

त्यासाठी तारांकित प्रश्‍न, कपात सुचनेद्वारे सुमारे शंभर कोटींची मंजुरी मिळाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत माणिकपुंज धरणातुन 19 गावांच्या योजनेचे काम सुरु आहे. वेहेळगाव, पिंपराळे, जामदरी, जळगाव खुर्द या चार गावांना मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतुन तेरा गावांच्या योजनेला मंजुरी मिळवली. मतदारसंघातील 56 गावांत पाणी योजना कार्यन्वीत झाली आहे. 

याविषयी ते म्हणाले, "मतदारसंघातील 151 पैकी 92 गावांत पाणी पोहोचवले आहे. उर्वरीत तेरा गावांचे काम प्रगतीपथावर आहेत. येत्या वर्षभरात शिल्लक राहिलेल्या गावांनाही पाणी योजना पोहोचवु. आवर्षनग्रस्त नांदगाव मतदार संघाला पाणीदार बनविण्याचा मानस आहे.'' 

मनमाड शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता. वीस बावीस दिवसांत एकदा पाण्याचे दर्शन होते. मनमाड पूरक वाढीव पाणी पुरवठा योजना राबवली. नांदगाव शहराचा पाणी प्रश्‍न स्वतंत्र योजना राबवली. सबंध नांदगाव तालुका पाणीदार होऊन येथील नागरिक, शेतकरी आपली पिण्याच्या पाण्याची व सिंचनाच्या गरजा भागवू शकणार आहे. आमदार म्हणुन केलेल्या या कामांची फारशी चर्चाही झालेली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com