panji-congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

गोव्यात कॉंग्रेसकडून फेरजुळणी सुरु

अवित बगळे
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

येत्या बुधवारनंतर राजकारण गती घेणार असले तरी मुख्य हालचालींपूर्व हालचाली सध्या सुरु झालेल्या आहेत. 

पणजी : येत्या बुधवारनंतर राजकारण गती घेणार असले तरी मुख्य हालचालींपूर्व हालचाली सध्या सुरु झालेल्या आहेत. 

कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी `गोवा फॉरवर्ड आपल्या एका मंत्रीपदाच्या बदल्यात वजनदार खाते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे' असा आरोप केल्यावर ज्या वेगाने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी बालीश म्हणून या आरोपांची संभावना केली त्यावरून पाणी कुठेतरी मुरते आहे, असे वाटण्याची शक्यता बळावली आहे.

कॉंग्रेस सत्ता प्राप्त करण्यासाठी राजकीय डाव टाकणार हे ठरून गेलेलेच आहे. त्याचाच एक भाग म्हणून पणजीकर यांनी जलसंपदामंत्री विनोद पालयेकर यांच्या मंत्रिपदाच्या बदल्यात गोवा फॉरवर्ड बडे खाते मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला.  

सरदेसाई अलीकडे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटून आल्याचा आणि उपसभापती मायकल लोबो यांना याच मंत्रिमंडळात स्थान मिळेल हे सरदेसाई यांनी केलेल्या वक्तव्याचा या साऱ्याला संदर्भ आहे. 

त्याही पुढे जात पणजीकर यांनी फॉर्मेलीन प्रकरणावरून सरदेसाई यांना सरकारवर दबाव वाढवायचा होता, ते लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांनी बाहेरून मासे आणण्यावरच बंदी घातली होती असा गौप्यस्फोट केला.

या साऱ्यामुळें सरदेसाई चिडणे स्वाभाविक होते. पालयेकर यांनीही सरदेसाई हे कॉंग्रेसच्या नेत्यांसारखे सौदे करणारे नाहीत असा टोला लगावला. सरदेसाई यांनी कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्याचा बालीश प्रयत्न करत आहे असे म्हटले आहे. एका प्रवक्त्याच्या आरोपावरून सरकार अस्थिर होत असेल तर पडद्याआड कोणती तरी हालचाल सुरु होती ही शंका घेण्यास जागा निर्माण झाली आहे.
 
कॉंग्रेस यापुढे सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यास सरदेसाई यांना सोबत घेणार नाही असे सांगून कॉंग्रेसने आज मगोसाठी आपले दरवाजे किलकिले केले. 

सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे मंत्री असूनही सरकारचा ताबा न मिळाल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे दुखावले जाणे स्वाभावीक आहे. येत्या बुधवारी पितृपक्ष संपतो त्यानंतर ढवळीकर निर्णय घेऊ शकतील असे गृहित धरून कॉंग्रेसने ही चाल खेळली आहे. मगोचे म्हणणे वरिष्ठ मंत्र्याकडे मंत्रिमंडळाचा ताबा द्यावा असे आहे तर गोवा फॉरवर्डचा त्याला विरोध असून त्यांनी कायम तोडग्याची मागणी केली होती. या मतभेदांचा फायदा घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. आजचे आरोप त्या रणनितीचाच एक भाग आहेत.

कॉंग्रेस गोंधळलेले आहे. त्यांचे वरिष्ठ नेते (लुईझिन फालेरो वैगेरे) इतर कामांत आहेत. त्यामुळे सरकार अस्थिर करण्याचा बालीश प्रयत्न करण्याचे काम प्रवक्त्यांवर कॉंग्रेसने सोपवले आहे. यातून त्यांचीच बौद्धीक दिवाळखोरी दिसते.
- विजय सरदेसाई, अध्यक्ष गोवा फॉरवर्ड

विजय सरदेसाई यांना महत्वाचे खाते मिळवून स्वतःचे महत्व वाढवायचे आहे. मायकल लोबो यांना मंत्री करण्यासाठी जलसंपदामंत्री विनोद पालयेकर यांचे मंत्रीपद काढून घेण्यास त्यांची संमती असेल.
- अमरनाथ पणजीकर, कॉंग्रेस प्रवक्ता

मंत्रिमंडळात भंडारी समाजाला प्रतिनिधीत्व हवे ही विजय सरदेसाई यांची सुरवातीपासूनची भूमिका आहे. ते स्वतः त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्यास तयार होते. कॉंग्रेस रडीचा डाव खेळत असल्याचे सिद्ध झाले आहे.
-विनोद पालयेकर, जलसंपदामंत्री

संबंधित लेख