पंढरपूर विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर  समिती अध्यक्षपदी अतुल भोसले 

पंढरपूर विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर  समिती अध्यक्षपदी अतुल भोसले 

मुंबई : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे भाजप नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने सोमवारी केली भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, श्री गहनीनाथ औसेकर महाराज,.एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड यांची नावे चर्चेत होती. 

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात भाजपची बाजू माध्यमापुढे मांडणारे माधव भांडारी यांना हे पद दिले जाईल अशी दाट शक्‍यता वर्तवण्यात येत होती. परंतु भोसले यांच्या नियुक्तीनंतर भंडारी यांच्यावर अन्याय झाला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भांडारी यांच्याशी संपक' साधला असता ते म्हणाले, की पंढरपूरच्या विठ्ठलावर माझी श्रध्दा आहे. मी पंढरपूरच्या देवस्थानचे अध्यक्षपद मिळावे यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. एवढेच नव्हे तर राज्यातील अन्य कोणत्याही देवस्थानाच्या अध्यक्षपदाचा आग्रह धरलेला नाही. माझे नाव कोणी चर्चेत आणले असेल ते मला माहीत नाही. परंतु वारकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा मी यापुढे प्रयत्न करणार आहे . 

दरम्यान मंदिर समितीचे प्रशासन चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती 30 जूनच्या आत करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात दिले होते. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भोसले यांच्या नावाला पसंती दिली आहे. 

अतुल भोसले हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष असून स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत. विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांची कन्या अतुल भोसले यांच्या पत्नी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com