पंढरपूरचा विठ्ठल मला आवडतो : शरद पवार 

 पंढरपूरचा विठ्ठल मला आवडतो : शरद पवार 

पुणे : मला पंढरपूरचा विठोब आवडतो. तेथे गेल्याने मला समाधान मिळते. मी देवळात जात नाही असे नाही. मी देवळांमध्ये जातो. तेथे मला शांतता आणि प्रोत्साहन मिळते. मात्र मी त्याचा बागुलबुआ करीत नाही अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिली. 

जागतिक मराठी अकादमीच्या वतीने शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन 'शोध मराठी मनाचा' या मालिकेअंतर्गत करण्यात आले होते. मनसेचे अध्यक्ष यांनी या प्रकट मुलाखती श्री.पवार यांना बोलते केले. या मुलाखतीदरम्यान राज यांनी एक महत्त्वाचा प्रश्‍न श्री. पवार यांना केला तो म्हणजे इतके वर्षे राजकारणात वावरताना देव आठवला का ? या प्रश्‍नावर ते म्हणाले, "" पंढरपूरचा विठ्ठल मला आवडतो. जसा मी पंढरपूरला जातो तसेच तुळजापूरच्या भवानी मंदिरात जातो, तसेच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही जातो. ही अशी ठिकाणी आहेत की येथे समाजातील लोक मोठ्या संख्येने वर्षोनुवर्षे जातात. त्या लोकांचा आदर करणे हा एक भाग आहे. काही ठिकाणी अशी आहेत की मला तेथे शांतता आणि प्रोत्साहन मिळते. मानसिक समाधान मिळते. मात्र मी देवळात जात असलो तरी त्याचा कधी बागुलबुआ करीत नाही.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com