Pandharpur Council Chief Quarrels over VIP Entry in Pandharpur Mandir | Sarkarnama

व्हीआयपी दर्शनावरून पंढरपूर शहराध्यक्षांचा विठ्ठलाच्या दरबारात गोंधळ

भारत नागणे
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

पंढरपूर : सहकारमंत्री सुभाष देशमुखांचे समर्थक व पंढरपूर भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी व्हीआयपी दर्शनासाठी विठ्ठलाच्या दरबारीच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत गोंधळ घातला. या गोंधळ घालणाऱ्या शहराध्यक्षांवर अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील वशिल्याच्या दर्शनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
संजय वाईकर आणि मंदिर समितीच्या सदस्या तथा भाजपच्या नगरसेविका शकुंतला नडगिरे हे 20 ते 25 लोकाना व्हीआयपी  दर्शनासाठी  घेऊन आले. दरम्यान दिवाळी सुट्ठी असल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी 'व्हीआयपी' दर्शन बंद ठेवले होते. व्हीआयपी दर्शनासाठी का सोडत नाही असे म्हणत भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मंदिरातील कर्मचारी विनोद वाघमारे व उपस्थित अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करत हजारो भाविकांच्या समोरच गोंधळ घातला.

सुमारे तासभर सुरू असलेला गोंधळ शांत करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला असता त्यांनाही त्यांनी धमकावले. या प्रकरणी वाईकर यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ही वाईकर यांनी व्हीआयपी दर्शनावरून मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना शिवगाळ केली होती. सतत त्यांच्याकडून होणाऱ्या गैरकृत्याबद्दल मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संबंधित लेख