pandharpur cong ncp combine programme | Sarkarnama

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे 'मनोमीलन पर्व' माढा मतदारसंघातून सुरु होणार! 

भारत नागणे 
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

पंढरपूर : राज्याच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचे स्थान नेहमीच आधोरेखीत झाले आहे. परंतु राज्यातील सत्ता परिवर्वतनानंतर जिल्ह्यातील राजकीय परिर्वतन ही तितक्‍याच गतीने झाले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या चर्चेला पुष्ठी देणाऱ्या राजकीय कार्यक्रमाचे येत्या शनिवारी ( ता.17) माढा लोकमतदार संघातील वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथे आयोजन करण्यात आले आहे. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या मनोमिलनाचा हा योग सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने घडवून आणला आहे. यामेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार यांची उपस्थिती राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणारी आहे. 

जिल्ह्यातील काही मोजके कार्यक्रम (वैयक्तीक स्वरुपाचे) वगळता गेल्या अनेक वर्षानंतर शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नेत्यांचा एकत्रित शेतकरी मेळावा प्रथमच माढा लोकसभा मतदार संघात होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना अनेक अडधळ्यांची शर्यंत पार करत विजय मिळवावा लागला. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेसाठी वर्ष शिल्लक असतानाही राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी माढ्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जानेवारी महिन्यांत शरद पवार अकलूज येथे आले होते. त्यानंतर लगेच माढा लोकसभा मतदार संघातील वाडीकुरोली येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये विश्वास निर्माण व्हा, माढ्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळावे यासाठीच श्री. काळे यांनी या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात केली जात आहे. कॉंग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे, मुधकर चव्हाण, हर्षवर्धन पाटील, आमदार प्रणिती शिंदे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रावादीचे खासदार विजयसिंह मोहेते, धनंजय माहाडीक, आणदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे,जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे आदींसह कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. माढयातील पहिल्या शेतकरी मेळाव्यात दोन्ही कॉंग्रेसचे नेते निवडणुकीच्या निमित्ताने काय बोलतात याकडेच लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख