pamkaja munde | Sarkarnama

पंकजा मुंडेंकडे गणपतीची स्थापना उत्साहात

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

महाराष्ट्रातील घराघरांत गणेशोत्सव साजरा होत असला तरी प्रत्येक घरात गणेशासाठीची आरास वेगळी आणि पूजापद्धतीही वेगळी. राज्यातील नेते आपल्या घरातील गणेशोत्सव कसा साजरा करतात, याची अनेकांना उत्सुकता असते. नेत्यांच्या घरातील गणेशोत्सवाची माहिती जाणून घ्या "सरकारनामा'वर! 

बीड : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे -पालवे यांच्याकडे पंधरा वर्षांपासून अखंड दहा दिवसांचा गणेशोत्सव असतो. यंदा शुक्रवारी मुंबईतील रॉयलस्टोन या निवासस्थानी दहा दिवसांच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. श्रीमती मुंडेंसह पती अमित पालवे, आई प्रज्ञा मुंडे, बहिण ऍड. यशश्री मुंडे आणि मुलगा आयर्न यांनी एकत्र येऊन श्रींची स्थापन केली. 

मखराला फुलांची आरास व विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराने श्रींचे पुजन करुन मोदक आणि पुरणपोळीचा नैवद्य भरवण्यात आला. त्यांनतर भक्तीभावाने श्रींची आरती करण्यात आली. पुर्वी माहेरी (दिवंगत मुंडेंच्या घरी) दहा दिवसांचा गणपती असायचा. लग्नानंतर पंधरा वर्षांपासून श्रीमती मुंडे स्वत:च्या घरी गणपतीची स्थापना करू लागल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असेपर्यंत या उत्सवाला पंकजांकडे आवर्जुन हजेरी लावायचे.

संबंधित लेख