पालघर जि. प. अध्यक्ष खरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर यांच्यात शीतयुद्ध? 

पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला अधिकारी वेळेवर उपस्थित न राहिल्याबद्दल शुक्रवारी (ता.16) जिल्हा परिषद अध्यक्षांनी तीव्र निषेध नोंदवला. त्यानंतर त्यांनी सदस्यांसह सभात्याग केला.
पालघर जि. प. अध्यक्ष खरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर यांच्यात शीतयुद्ध? 

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला अधिकारी वेळेवर उपस्थित न राहिल्याबद्दल शुक्रवारी (ता.16) जिल्हा परिषद अध्यक्षांनी तीव्र निषेध नोंदवला. त्यानंतर त्यांनी सदस्यांसह सभात्याग केला. 

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची 17 जानेवारीला स्थगित झालेली सभा सकाळी 11.30 वाजता पंचायत समिती संकुलात बोलावण्यात आली होती. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष नीलेश गंधे, सर्व विषय समित्यांचे सभापती आणि स्थायी समितीचे सदस्य वेळेवर उपस्थित होते. त्यांनी सुमारे पाऊण तास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागप्रमुखांची वाट पाहिली. दुपारी 12.15 वाजेपर्यंत अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीच्या स्थळी न आल्याबद्दल अध्यक्ष खरपडे आणि इतर सदस्यांनी निषेध नोंदवला; त्यानंतर ते निघून गेले.

आता बैठक बुधवारी 
स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पासंदर्भात आढावा, शिपाई भरतीमधील गैरव्यवहार आणि समायोजन प्रक्रियेतील पदावनती आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. आता ही बैठक 21 फेब्रुवारीला होईल. बैठकीला सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांनी सकाळी 11.15 वाजण्यापूर्वीच उपस्थित राहावे, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी पत्राद्वारे दिली आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी विलंबाने येत असल्याचा निरोप नव्हता. कोणत्याही विभागप्रमुखाने उशिरा येत असल्याची सूचना दिली नव्हती, त्यामुळे निघून गेलो, असे खरपडे यांनी "सकाळ'ला सांगितले. 
 

आपल्या दालनात युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोजेक्‍ट (यूएनडीपी) आणि एल अँड टी यांच्या अधिकाऱ्यांची महत्त्पूर्ण बैठक सुरू होती, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले. या बैठकीत कुपोषण, आरोग्य, कृषी, पाटबंधारे आदी विषयांवर मार्गदर्शन होणार होते. म्हणून आपल्यासह संबंधित विभागप्रमुख स्थायी समितीच्या बैठकीला काहीशा विलंबाने 12 वाजता पोहोचलो. उशीर होत असल्याचा निरोप पाठवला होता असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com