Palghar news - Vilas Tare | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

बोईसर आमदार विलास तरे यांचा भाऊ पेट्रोल चोरीप्रकरणी अटकेत

नीरज राऊत
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदारसंघाचे आमदार विलास सुकून तरे यांचे बंधू जयदास सुकूर तरे यांना पेट्रोल पंपावरील इंधन चोरी प्रकरणात अटक झाल्याने आमदारांवर नामुस्कीली ओढवली आहे.

 

पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांचे बंधू जयदास तरे यांना पेट्रोल पंपावरील इंधन चोरी प्रकरणात अटक झाल्याने आमदारांवर नामुस्कीली ओढवली आहे.

पेट्रोल पम्पाच्या यंत्रांमध्ये फेरफार करून ग्राहकांची लूट केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत रायगड येथील समर्थ कृपा पेट्रोल पंपाचे मालक जयदास तरे यांना अटक केली आहे. बोईसर विधानसभा क्षेत्रातून बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. शिक्षणानंतर जयदास तरे यांनी तलावातील- धरणातील मासळी राखण्याच्या व विक्रीच्या व्यव्यसायात होते. गेल्या दोन- तीन वर्षांपूर्वी त्यांनी रायगड येथे पेट्रोल पंप सुरु केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून इंधन चोरीच्या संशयावरून राज्यभरातील 178 पेट्रोल पुमपांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या धाडींमधून पेट्रोल पंपावर इंधनचोरी उघड करत पोलिसांनी अजूनपर्यंत 24 आरोपीना अटक केली आहे. इंधन चोऱ्यांच्या यादीत बोईसरच्या आमदारांच्या सख्खा भाऊ गोवला गेल्याने विलास तारे यांच्यावर नामुस्कीली ओढवली आहे. 
 

संबंधित लेख