Palghar-loksabha.
Palghar-loksabha.

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : भाजप विरोधात शिवसेना उमेदवार देणार का ?  

पालघर : पालघर लोकसभा पोट निवडणूक 28 मे रोजी होणार असून भाजप विरोधात सर्व विरोधक एकत्रित येतील अशी चिन्हे दिसत आहेत . या निवडणुकीसाठी उमेदवार येत्या काही दिवसात जाहीर होणार असले तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पालघर :  पालघर लोकसभा पोट निवडणूक 28 मे रोजी  होणार असून भाजप विरोधात सर्व  विरोधक  एकत्रित येतील अशी चिन्हे दिसत आहेत .  या निवडणुकीसाठी उमेदवार येत्या काही दिवसात जाहीर होणार असले तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचा 30 जानेवारी रोजी अकस्मात निधन झाल्याने ही निवडणूक घेण्यात येत असून त्यांचा जेष्ठ चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना किंवा स्नुषा यांना उमेदवारी मिळावी असा कार्यकर्त्यांचा सूर होता.

वनगा कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी या भाजपाच्या मित्र पक्षांकडून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या तीन महिन्यात भाजपाने दिवंगत खासदारांबद्दल ची सहानुभूती टिकवून ठेवण्यासाठी किंचितही प्रयत्न न केल्याने श्रीनिवास वनगा यांना सहानुभूतीचा कितपत लाभ होईल या बद्दल शंका आहे.

आशा परिस्थिती पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री विष्णू सवरा यांना भाजपा निवडणुकीत उतरविण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बहुजन विकास आघाडी तसेच शिवसेना देखील रिंगणात उतरतील आणि बहुरंगी लढत होईल.

बहुजन विकास आघाडीने (ब वि आ) ही निवडणूक भाजपा विरोधात लढवायची किंवा नाही या संदर्भात रविवार (ता 30) रोजी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.  बहुजन विकास आघाडीने  पोट निवडणूक लढवण्याचा  निर्णय घेतला तर त्यांची काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी होऊन माजी खासदार बळीराम जाधव, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर  किंवा अन्य उमेदवाराला संधी देण्याच शक्यता आहे.

ब वि आ ने भाजपा ला पाठिंबा दिल्यास काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या मदतीने ही निवडणूक वाढविणे निश्चित आहे. काँग्रेस तर्फे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी खासदार दामू शिंगडा यांची नावे चर्चेला असून कॉमुनिस्ट पक्षाचा या निवडणुकी पुरता पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे निधनानंतर च्या पोट निवडणुकीत भाजपाने त्यांच्या चिरंजीवला सेना उमेदवार म्हणुन पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड करण्याची वेळ आल्याने या निवडणुकीत अपवादमक परिस्थिती वगळता निवडणूक लढवण्याची शक्यता कमी दिसते.एकंदरीत पालघरच्या पोट निवडणूकीत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत सध्या तरी अपेक्षित आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com