पालघर पोटनिवडणुकीच्या समीकरणात बदल होण्याची शक्‍यता 

पालघरचे खासदार ऍड्‌. चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनामुळे पोटनिवडणूक घोषित होण्याची शक्‍यता आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंघात एक लाख 46 हजार मतदारांची भर पडली असल्याने पोनिवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.
पालघर पोटनिवडणुकीच्या समीकरणात बदल होण्याची शक्‍यता 

पालघर : पालघरचे खासदार ऍड्‌. चिंतामण वनगा यांच्या आकस्मिक निधनामुळे पोटनिवडणूक घोषित होण्याची शक्‍यता आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंघात एक लाख 46 हजार मतदारांची भर पडली असल्याने पोनिवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

लोकसभेसाठी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी पालघर मतदारसंघात 15 लाख 77 हजार मतदार होते; त्यापैकी 9 लाख 92 हजार जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर 1 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या आकडेवारीनुसार नालासोपारा विधानसभा क्षेत्रात 81 हजार नव्या मतदारांची नोंद झाली असून मतदारसंख्या चार लाख 29 हजार झाली आहे. वसईत 4300 वाढीसह मतदारांची संख्या दोन लाख 74 हजारांवर गेली आहे. बोईसरमध्ये 12 हजारांनी वाढ होऊन आता दोन लाख 57 हजार मतदारांची नोंद झाली आहे. 

पालघरमध्ये 20 हजार मतदार वाढले असून एकूण संख्या दोन लाख 58 हजार झाली आहे. विक्रमगडमध्ये 11 हजारांच्या वाढीनंतर मतदारसंख्या दोन लाख 53 हजार, तर डहाणूमध्ये 20 हजारांच्या वाढीनंतर मतदारसंख्या दोन लाख 51 हजार झाली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील लोकसंख्या अंदाजे 24 लाख 62 हजार असून मतदारांची संख्या 17 लाख 24 हजारांवर गेली आहे. 

नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील मतदारसंख्येत झालेली वाढ आणि एकूण मतदारसंख्या पाहता येथील मतदारांचा कौल आगामी पोटनिवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरेल. पालघर आणि डहाणूतही मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com