Palghar district created but problems remain unchanged : Hitendra Thakur | Sarkarnama

जिल्ह्याच्या निर्मितीनंतरही समस्या कायम : आमदार हितेंद्र ठाकूर 

संदीप पंडित
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पर्यटन विकासाच्या योजना कागदावरच असल्याने बेरोजगारांना फायदा होत नाही. युवकांच्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.
- आमदार हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडी

विरार  : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला चार वर्षे झाल्यानंतरही समस्या कायम आहेत. अनेक कार्यालये सुरू न झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लगत आहे. त्यामुळे जिल्ह्याला चार वर्षे झाल्याचा आनंद व्यक्त करावा की खेद, हेच समजत नाही; अशी भावना बहुजन विकास आघाडीचे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली.

पालघर जिल्ह्याच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आमदार हितेंद्र ठाकूर बोलत होते . ते म्हणाले ,"   जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस मुख्यालय आणि इतर असे विभाग सुरू झाले असले, तरी जिल्हा न्यायालय, कुटुंब न्यायालय, प्रदूषण नियंत्रण विभाग आदी 28 कार्यालयांसाठी पालघरमधील नागरिकांना आजही ठाण्याला जावे लागते. सिडकोला दिलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या कामाला वेग आलेला नाही."

" मोखाडा, जव्हार, डहाणू या आदिवासीबहुल भागांच्या विकासाला गती देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज आहे. कुपोषणाची समस्या गंभीर असूनही जिल्हा रुग्णालयाचा पत्ता नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करावे लागेल. पायाभूत सोई-सुविधा तातडीने दिल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकेल "असे ते म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख