चिंतामण वनगा यांचा उत्तराधिकारी कोण? 

दिवंगत खासदार ऍड्‌. चिंतामण वनगा यांचे उत्तराधिकारी म्हणून ज्येष्ठ पुत्र श्रीनिवास यांचे नाव कुटुंबीयांनी पुढे केल्याचे वृत्त आले होते. त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. भाजपने अद्याप प्रसिद्धिपत्रक जारी केलेले नाही.
चिंतामण वनगा यांचा उत्तराधिकारी कोण? 

पालघर : दिवंगत खासदार ऍड्‌. चिंतामण वनगा यांचे उत्तराधिकारी म्हणून ज्येष्ठ पुत्र श्रीनिवास यांचे नाव कुटुंबीयांनी पुढे केल्याचे वृत्त आले होते. त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. भाजपने अद्याप प्रसिद्धिपत्रक जारी केलेले नाही. 

भाजप पदाधिकाऱ्यांना वनगा यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करावा लागेल, असे दिसत असले; तरी त्याबाबत जिल्ह्यातील भाजप नेते काही प्रमाणात नाराज असल्याचे समजते. 

पोटनिवडणूक घोषित झाल्यानंतर भाजप उमेदवाराचे नाव जाहीर होईलच, मात्र दरम्यानच्या काळात वनगा यांच्याबाबत असलेली सहानुभूती कायम ठेवण्यासाठी पक्षातर्फे आखणी करण्यात येत आहे.

भाजपने 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने वनगा कुटुंबाबाहेरील उमेदवार दिल्यास पोटनिवडणुकीचे समीकरण बदलेल, अशी चिन्हे आहेत. पोटनिवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी आणि कॉंग्रेसने तयारी सुरू केली असून शिवसेना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com