राज ठाकरे यांनी केले आदिवासी पाड्यावर जेवण

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पालघर येथे सभा घेतल्यानंतर आज वाडा तालुक्यातील कार्यकर्त्याच्या आदिवासी पाड्यावरील घरी जेवण घेतले.
राज ठाकरे यांनी केले आदिवासी पाड्यावर जेवण

पालघर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पालघर येथे सभा घेतल्यानंतर आज वाडा तालुक्यातील कार्यकर्त्याच्या आदिवासी पाड्यावरील घरी जेवण घेतले.  
 
पालघरच्या सभेत भाजपवर टीका करीत ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱयाला सुरवात केली. मनसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी हा त्यांचा दौरा आहे. आज पालघर जिल्ह्यात त्यांनी दौरा केला. त्यावेळी वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी त्यांनी जेवण घेतले. त्यांच्यासमवेत मनसेचे नेते बाळा नांदगावकरही होते. अतिशय साध्या पद्धतीने चटईवर बसून राज ठाकरेसह सर्वांनी जेवण केले. 

वसईत काल रात्री झालेल्या जाहीर सभेनंतर राज ठाकरे यांनी बोईसर येथे वास्तव्य केले. त्यांनी आज सकाळपासूनच सिटिझन फोरम, मुंबई- वडोदरा एक्‍स्प्रेस- वेविरोधी संघर्ष समिती, सूर्या पाणी बचाव समिती, जेएसडब्ल्यू व वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. मोदी सरकारच्या नोटाबंदी, जीएसटी आदी निर्णयांमध्ये पारदर्शकता नाही, अशी टीका त्यांनी केली. यापुढे आपण भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

`मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी 
पालघर गुजरातला जोडतील' 

बोईसर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की गुजरातशी संलग्न करून मुंबईवर ताबा मिळवण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठी प्रथम पालघर जिल्हा गुजरातला जोडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशात आपणच प्रथम एल्गार पुकारला असून, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेणार आहोत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com