भारताच्या निर्बंधांचा पाकला फटका, टोमॅटो 180 रुपये किलो 

  भारताच्या निर्बंधांचा पाकला फटका, टोमॅटो 180 रुपये किलो 

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात "जैशे महंमद'ने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे.

याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये महागाई प्रचंड वाढू लागली आहे. लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल 180 रुपये मोजावे लागत आहेत, इतर भाज्यांचे दरही कडाडले आहेत. 

पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 40 जवान हुतात्मा झाले. यामुळे संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर म्हणून भारताने अद्याप युद्ध हा पर्याय स्वीकारला नसला, तरीही आर्थिक आणि राजकीय कोंडी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. 

हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तानचा सर्वाधिक प्राधान्य असलेला देशाचा (एमएफएन) दर्जा काढून घेतला आणि आयात- निर्यात शुल्कही वाढविले. त्याचवेळी, देशातील व्यापाऱ्यांनीही पाकिस्तानला होणारी निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्तेमार्गाने होणारी मालवाहतूक बहुतांशी ठप्प झाली आहे. मध्य प्रदेशमधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा माल पाकिस्तानमध्ये न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

आझादपूर येथील भाजी मंडईतून पाकिस्तानला सर्वाधिक नाशवंत माल पुरवठा केला जातो. अटारी- वाघा या मार्गे रोज किमान 75 ते 100 ट्रक टोमॅटो पाकिस्तानला निर्यात केला जात असे. पुलवामा हल्ल्यानंतर ही निर्यात बंद झाली आहे.

टोमॅटोशिवाय इतर भाज्या, कापूस इत्यादींच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. 2017 मध्येही भारत- पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता, त्यावेळीही निर्यात बंद केल्यानंतर लाहोर आणि पंजाब प्रांतात काही ठिकाणी टोमॅटोचे भाव 300 रुपये प्रतिकिलो एवढे झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com