शरद पवार म्हणाले, साताऱ्यात एकच पैलवान!
सातारा : सातारा तालिम संघातील पैलवानांनी शासकिय विश्रामगृहात खासदार शरद पवारांसोबत फोटो काढण्याची विनंती केली. फोटोसाठी उभ्या असलेल्या पैलवानांकडे पाहून श्री. पवार म्हणाले, पैलवानांसोबत फोटो काढायला सांगताय पण, यापैकी एकही पैलवान दिसत नाही. मात्र, उदयनराजेंकडे पाहून त्यांनी हा एकच पैलवान दिसतोय, अशी फिरकी टाकली. त्यामुळे कक्षात एकच हशा पिकला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार आज रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम संपल्यावर शासकिय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले कक्षात आले. त्यापूर्वीच त्यांच्यासोबत कुस्तीगिर परिषदेच्या कामासाठी सुधीर पवार तसेच सातारा तालिम संघातील काही पैलवान भेटण्यासाठी आले होते.
चर्चा झाल्यावर पैलवानांनी श्री.पवार यांच्यासोबत फोटो काढण्याची अपेक्षा व्यक्त केली. पवारांनी ती तातडीने मान्य केली. सर्वजण त्यांच्यासोबत उभे राहिले. त्यावेळी उदयनराजेही तिथेच उभे होते. काही पैलवानांनी उदयनराजेंनाही फोटोसाठी उभे राहण्याची विनंती केली. श्री. पवारांच्या राजकिय नजरेतून आजपर्यंत कोणीही सुटलेला नाही. फोटोसाठी त्यांच्या शेजारी उभे राहिलेल्यांकडे पाहून श्री. पवार म्हणाले, पैलवानांसोबत फोटो काढायला सांगताय पण, यापैकी एकही पैलवान दिसत नाही. तेवढ्यात उदयनराजेंकडे पाहून श्री. पवारांनी मात्र, हा एकच पैलवान दिसतोय, अशी फिरकी टाकली. त्यावर उपस्थितांत एकच हशा पिकला. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विश्वजित कदम, माजी सभापती सुनील काटकर, तसेच तालिम संघातील पैलवान उपस्थित होते.