Padma Ingle Lefts RPI | Sarkarnama

पद्मा इंगळे यांची रिपब्लिकन पक्षाला सोडचिठ्ठी; भारिप बहुजन महासंघात प्रवेश

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा एकीकडे जन्मदिवस तर दुसरीकडे महिला मुक्ती दिन असतानाच आठवले गटाच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा पद्मा इंगळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जाहिररित्याप्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे.

उल्हासनगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा एकीकडे जन्मदिवस तर दुसरीकडे महिला मुक्ती दिन असतानाच आठवले गटाच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा पद्मा इंगळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जाहिररित्याप्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे.

पूर्वी उल्हासनगरात व आता अंबरनाथमध्ये राहत असलेल्या पद्मा इंगळे ह्या गेल्या 15 वर्षांपासून  सामाजिक,धार्मिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्या सात-आठ वर्षे आठवले गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी कार्यरत होत्या.परखड भाषण करण्यात तरबेज असलेल्या इंगळे ह्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होत होत्या. मात्र आठवले गटातच वाढलेली गटबाजी,वादविवाद बघून पद्मा इंगळे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 

रामदास आठवले यांच्या जन्मदिनी महिला मुक्ती दिनाच्या शहापूर ग्रामीण मधील कार्यक्रमात महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अंजली प्रकाश आंबेडकर यांच्या साक्षीने तसेच जिल्हा निरिक्षक रतन बनसोडे,प्रा.वाय.के.ठोंबरे, अॅड शिला जनपदकर,अश्विनीत कांबळे ,भिवंडीचे अध्यक्ष अनिल भवार यांच्या उपस्थितीत भारिप बहुजन महासंघ महिला आघाडीत प्रवेश केला.

संबंधित लेख