pachpute vs jagtap in shrigonda | Sarkarnama

पाचपुते काय ठोकतात? जगताप काय लाटतात? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नगर : सध्या विविध विकासकामांचा सपाटा सुरू झाला आहे. श्रीगोंदे विधानसा मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगत आहे. विकास कामाच्या उदघाटनांच्या निमित्ताने गावोगावी फिरून ते एकमेकांची खिल्ली उडवित आहेत. त्यामुळे उपस्थितांचीही चांगली करमणूक होत आहे. 

आमदार जगताप यांनी पाचपुते यांना प्रत्येक कार्यक्रमात लक्ष्य करीत टीका केली. ते कामे करीत नाहीत. नुसत्याच गप्पा ठोकतात. त्यांनी सत्ता घालविली, पण श्रेय घेण्याची सवय त्यांची गेली नाही. सत्तेत त्यांना जमले नाही, ते आपण पाच वर्षांत पूर्ण करून दाखविले, असा टोला पाचपुते यांचे नाव न घेता एका कार्यक्रमात त्यांनी लगावला. 

जगताप यांच्या टीकेला उत्तर देताना पाचपुते त्यांच्या खास शैलीत बोलतात. आमदारांनी चार वर्षांत काय केले, याचा लेखाजोखा त्यांनी जनतेला द्यावा. ते फुकटचे श्रेय लाटतात. लोकांची दिशाभूल करतात. हे प्रकार थांबवून त्यांनी विकासकामांकडे लक्ष द्यावे. जनतेसाठी चार वर्षांत किती निधी आणून किती कामे केली, याचा त्यांनी हिशोब द्यावा, असे आवाहन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आमदार जगताप यांना एका कार्यक्रमात केले. 

दरम्यान, भाजपचे बबनराव पाचपुते व राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्यात विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढण्यासाठी त्यांची धरपकड सुरू आहे. दोन्ही नेते प्रत्येक गावातील कार्यक्रम सोडत नाहीत. दरम्यान, श्रावण महिन्यात प्रत्येक गावात सप्ताह असतात. त्यामध्ये पूर्वीप्रमाणे पाचपुते प्रवचन करणार का आणि केले, तर ते राजकीय की धार्मिक, अशी चर्चा आता ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे. 

संबंधित लेख