त्याला 50 लाख देवू : पी.एन. पाटील
आरोप करण्याआधी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी.
कोल्हापूर : जिल्हा सहकार दूध उत्पादक (गोकुळ) संघात दहा ते वीस लाख रुपये घेवून नोकर भरती केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र हा आरोप करण्याआधी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी. तसेच, कोणीही सांगू देत की दहा ते वीस लाख घेवून नोकरी दिली, त्याला 50 लाख रुपये देऊ, असा पलटवार माजी आमदार पी.एन. पाटील यांनी केला.
`कॉफी वुईथ सकाळ`मध्ये ते बोलत होते.
विद्यमान संचालकांचे दहा ते वीस लाख घेवून नोकर भरती करण्यापलिकडे कोणतेही योगदान नाही. असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला होता. याला यावर ते बोलत होते. श्री पाटील म्हणाले, कोणताही आरोप करण्याआधी किमान काय बोलता, याची खात्री करावी. कोणी त्यांच्याकडून 10- 20 लाख रुपये घेतल्याचे सांगितले तर त्यांना 50 लाख रुपये देऊ, असे आवाहन केले.