p n patil questions chandradeep narake about gokul corruption | Sarkarnama

चंद्रदीप, 'गोकुळ'ची मलई कोणी किती खाल्ली, हे स्वतःच्या काकाला विचारा!  

​सुनील पाटील
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

मी सतरा पक्षांच्या जीवावर आमदार झालो नाही :पी. एन. पाटील

कोल्हापूर: मी सतरा पक्षांच्या जीवावर आमदार झालो नाही, असा टोला माजी आमदार पी. एन. पाटील यांनी आमदार चंद्रदीप नरके यांना लगावला. 

गोकुळ मल्टीस्टेट करण्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान श्री पाटील  यांनी गोकुळ मल्टीस्टेट व्हावा यासाठी करवीर तालुक्यातील दुग्ध उत्पादक आणि सभासदांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

श्री पाटील म्हणाले 'गोकुळ' मध्ये कोणी, किती मलई खाल्ली हे स्वतःच्या काकाला विचारावे ( गोकुळ चे विद्यमान संचालक आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष अरुण नरके) यांना हा जाब विचारावा. ४१ वर्षे ते गोकुळचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांना जास्त माहिती आहे, असा ही टोला श्री पाटील यांनी लगावला. शासनाने जाहीर केलेल्या  कर्जमाफीत लाखो शेतकरी वंचित आहेत. तरीही सभागृहात तोंड न
 उघडणार्यांनी माझ्या नादाला लागू नये, असा इशारा ही पाटील यांनी दिला.

संबंधित लेख