p n patil criticise chandradeep narake | Sarkarnama

चंद्रदीप नरके यांना बोललेले ऐकायला जात नाही, त्यात माझा काय दोष?

सुनील पाटील 
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

आमदार हसन मुश्रीफ यांचा संचालक गोकुळमध्ये असेलतर सर्व चालते, पण आता त्यांना गोकुळचे निर्णय चुकीचे वाटतात. सिमाभागात जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे साखर कारखाने, दूध संघ मल्टिस्टेट आहेत. त्या कारखान्याचे आणि संघाचे मालक आणि अध्यक्ष हे कर्नाटकचे नाही तर कोल्हापूरातीलच आहेत. मग गोकुळमध्ये हा धोका का वाटतो?

- पी. एन. पाटील 

कोल्हापूर : आपण काहीही बोललेले आमदार चंद्रदीप नरके यांना ऐकायला जात नाही, असा पलटवार माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केला आहे.

मल्टिस्टेटबाबत पी.एन. पाटील बोलत नाहीत, अशी टिका चंद्रदीप नरके यांनी केली होती. तर, मल्टिस्टेटमूळे संघ अडचणीत येईल म्हणून आमदार हसन मुश्रीफ, आमदार नरके, आमदार सतेज पाटील घेते आहेत. 

श्री पाटील म्हणाले, सिमाभागात असणारे काही दूध संघ, मुश्रीफ यांचा संताजी घोरपडे तसेच इतर काही साखर कारखाने आणि संघ मल्टिस्टेट आहेत. यामध्येही कर्नाटकचे सभासद आहेत. पण, या कोणत्याही संस्थेचा मालक किंवा अध्यक्ष कर्नाटकचा नाही. हे जिल्ह्यातील विरोध करणाऱ्या नेत्यांना वेगळे सांगायची गरज नाही. गोकुळ मल्टिस्टेट होणे कसे फायद्याचे आहे आपण वारंवार सांगत आलो आहे, पण आमदार चंद्रदीप नरकें यांना ऐकायला जात नाही, त्याला आपण काहीही करू शकत नाही.

श्री नरके यांनी मेळावा घेण्याआधीच एका दूध संस्थेच्या उद्‌घाटनावेळी "गोकुळ' मल्टिस्टेट झाल्यावर काय फायदा होणार हे सांगितले होते. वृत्तपत्रात त्याच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत. पण, नरके यांना आपले काहीही बोललेले ऐकायला जात नाही, त्या आमचा दोष नाही. दरम्यान, शेतकऱ्यांचा ज्यांना कळवळा आहे, त्यांनी जिल्ह्यातील जे दूध संघ, कारखाने बंद पडले त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपये अडकून पडले आहेत. ते परत मिळविण्यासाठी प्रयत्न का केला जात नाही, असा सवालही श्री पाटील यांनी केला.  

संबंधित लेख