p n pati kdac issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

KDC: "भोगावती'मुळे पी. एन. यांची संधी हुकणार ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेतील दोन्ही कॉंग्रेसच्या समझोता एक्‍सप्रेसला ब्रेक लागल्याने व "भोगावती'चे अध्यक्षपद कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी स्विकारल्याने बॅंकेच्या अध्यक्षपदाचा पाच वर्षाचा कार्यकाल आमदार हसन मुश्रीफच पूर्ण करणार आहेत. उपाध्यक्ष अप्पी पाटील यांना मात्र बदलण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेतील दोन्ही कॉंग्रेसच्या समझोता एक्‍सप्रेसला ब्रेक लागल्याने व "भोगावती'चे अध्यक्षपद कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी स्विकारल्याने बॅंकेच्या अध्यक्षपदाचा पाच वर्षाचा कार्यकाल आमदार हसन मुश्रीफच पूर्ण करणार आहेत. उपाध्यक्ष अप्पी पाटील यांना मात्र बदलण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

सहा वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर 2015 मध्ये झालेली बॅंकेची निवडणूक दोन्ही कॉंग्रेसने एकत्रित लढवली. विकास संस्था गटाच्या हातकणंगले, पन्हाळा, राधानगरी व करवीर तालुक्‍यातील जागा बिनविरोध झाल्या. निवडणुकीतील आघाडी कायम ठेवत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची वाटणी करण्याच्या अटीवर दोन्ही कॉंग्रेसमध्ये समझोता एक्‍सप्रेस धावली. त्यात पहिली दोन वर्षे राष्ट्रवादीकडे अध्यक्ष पद तर त्यानंतरची दोन वर्षे कॉंग्रेसला हे पद देण्याचे ठरले. शेवटच्या वर्षी पुन्हा राष्ट्रवादीला हे पद द्यायचे असे ठरले होते. श्री. मुश्रीफ 25 मे 2015 रोजी अध्यक्ष झाले. ठरल्याप्रमाणे 25 मे 2017 रोजी त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. पण कॉंग्रेस नेतृत्त्वाने नंतर याची विचारपूस न केल्याने ते या पदावर कायम राहीले. आता कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे "भोगावती' चे अध्यक्ष झाल्याने त्यांना एकाचवेळी दोन संस्थांत या पदावर काम करता येत नाही. त्यात राष्ट्रवादीच्या संचालक श्री. मुश्रीफ हेच "सिनियर' आहेत, त्यामुळे तेच पाच वर्षे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राहतील. 

राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ म्हणून अध्यक्षपदासाठी आमदार हसन मुश्रीफ यांचे नांव पुढे आले. पण त्यांना या पदापासून रोखण्यासाठी मोठी खेळी झाली. मोक्‍याच्या क्षणी माजी मंत्री विनय कोरे हे त्यांच्यासोबत ठाम राहील्याने त्यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर जिल्हा बॅंकेचेही राजकारण बदलत गेले. राष्ट्रवादीचे म्हणून ओळख असलेल्या अशोक चराटी, पी. जी. शिंदे यांनी अलिकडेच भाजपात प्रवेश केला आहे. माजी आमदार के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटली यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन जागा रिक्त आहेत. या दोघांच्या जागी अनुक्रमे रणजित पाटील व सौ. अर्चना पाटील यांची केलेली निवड सहकार प्राधिकारणाने रद्द केली आहे. माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे. ही. 

केडीसी संख्याबळ : 
एकूण जागा - 21 
रिक्त जागा - 3 
शिल्लक संचालक - 18 
कॉंग्रेस- 5 
राष्ट्रवादी - 6 
भाजपा - 3 (चराटी, अनिल पाटील, पी. जी. शिंदे) 
कोरे गट - 2 
तटस्थची शक्‍यता - 2 (महाडीक, प्रा. मंडलिक) 

संबंधित लेख