p b sawant and state government | Sarkarnama

ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावे - पी. बी. सावंत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे : सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे त्यासाठी ओबीसीचा 27 टक्‍क्‍यांवरून वाढवून 43 टक्‍क्‍यांवर न्यावा असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी केले. एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. सरकारने आरक्षण देताना जो शब्दच्छल केलाय ती शाब्दीक चलाखी आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

ओबीसींच्यासाठी राखीव 27 टक्के आरक्षणात मराठा समाजाला सहभागी होता येणार नाही अशी तरतूद केली म्हणजे ओबींसींचाही या समावेशाला विरोध राहणार नाही असे ते म्हणाले. सरकारला जर हे आरक्षण द्यायचे होते तर सरकारने हे आरक्षण वेगळा प्रवर्ग न करता ओबीसी कोट्यातूनच द्यायला हवे होते, त्यासाठी वेगळा वर्ग केला हे सांगायची गरज नव्हती. असा वर्ग केला हे मुळात चूक आहे. आधीच असा वर्ग असल्याने या नव्या वर्गाला कसलाही कायदेशीर आधार नाही. सरकारला जर आधीच्या ओबीसी गटाचे आरक्षण कायम ठेवायचे होते व त्याला धक्का लावू न देता हे साधायचे होते तर आधीच्या कायद्यात फक्त दुरुस्ती करून तसे आरक्षण देता आले असते असे मत त्यांनी व्यक्त केले. 

संबंधित लेख