owaissy- ambedkar rally in satara on 17 jan | Sarkarnama

ओवैसी- प्रकाश आंबेडकर 17 जानेवारीला साताऱ्यात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

छोटे छोटे बहुजनांचे समुह आहेत. त्यांच्यात उर्जा निर्माण होण्यासाठी हे सत्ता संपादन मेळावे आम्ही घेत आहोत, असे  चंद्रकांत खंडाईत यांनी सांगितले.

सातारा: येत्या 17 जानेवारीला खासदार असद्दुदीन ओवैसी व प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे अधिवेशन होणार आहे. त्या दृष्टीकोनातून भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी तडफेने कामाला लागले आहेत.  

भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी समाजातील वंचित घटकांची आघाडी बनवली आहे. त्यादृष्टीकोनातून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय सत्ता संपादन मेळावे सुरू आहेत.  

आतापर्यंत दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांचा साताऱ्यात दौरा झाला आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भुमिकाही येथे मांडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिवसेनेनंतर आता वंचित बहुजन आघाडीचीही मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. येत्या 26 नोव्हेंबरला पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातून अधिकाधिक कार्यकर्ते जावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

 

संबंधित लेख