ओवेसींना टक्कर देण्यासाठी आता राजा भैय्या शनिवारी औरंगाबादमध्ये

ओवेसी यांच्या तोफेला तोंड देण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीने देखील हैदराबादेतील गोशमहल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ठाकूर राजासिंग लोध यांना औरंगाबादेत निमंत्रित केले आहे. जांबिदा मैदानावरील ओवेसींच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेला राजासिंग सिडको हिंदुबहुल भागात सभा घेणार आहेत. ओवसी बंधुवर ते या सभेत काय टिका करतात ? त्यांच्या हल्ल्याला कसे उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ओवेसींना टक्कर देण्यासाठी आता राजा भैय्या शनिवारी औरंगाबादमध्ये

औरंगाबाद : हैदराबादेत एकमेकांचे कट्टर विरोधक आणि आपल्या घणाघाती भाषणासाठी ओळखले जाणारे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि भाजपचे आमदार ठाकूर राजासिंग लोध उर्फ राजा भैय्या यांच्यात आता औरंगाबादेत टक्कर होणार आहे. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी यांनी दोन दिवसापासून शहरातील गल्लीबोळात फिरून प्रचार सुरू केला आहे. आता शिवेसना-भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी राजा भैय्या यांना औरंगाबादेत बोलावण्यात आले आहे. ओवेसी यांच्या भाषणाला राजा भैय्या कसे उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. 

हैदराबादेत रामनवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या आयोजनासाठी राजा भैय्या देशभरात ओळखले जातात. असदुद्दीन, अकबरोद्दीन या ओवेसी बंधूंना त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देणारा निर्भीड नेता म्हणून त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादेत शनिवारी (ता.20) सायंकाळी सिडकोतील अविष्कार चौकात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकमेव औरंगाबाद लोकसभेची जागा लढवत असलेल्या एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपुर्वीच असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत दाखल झाले आहेत. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत ते शहर व ग्रामीण भागात पदयात्रा, जाहीर सभा व कॉर्नर बैठका घेऊन एमआयएमला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मुस्लिम बहुल भागात ओवेसी यांच्या सभा आणि पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

शहरातील जांबिदा मैदानावर ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त जाहीर सभा देखील उद्या (ता.19) होणार आहे. ओवेसी यांच्या तोफेला तोंड देण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीने देखील हैदराबादेतील गोशमहल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ठाकूर राजासिंग लोध यांना औरंगाबादेत निमंत्रित केले आहे. जांबिदा मैदानावरील ओवेसींच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेला राजासिंग सिडको हिंदुबहुल भागात सभा घेणार आहेत. ओवसी बंधुवर ते या सभेत काय टिका करतात ? त्यांच्या हल्ल्याला कसे उत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हैदराबादेतील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ओवेसी आणि राजाभैय्या औरंगाबादेत आमने सामने येणार आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com