ovesi and ambedkar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

औवेसी यांची मैत्री आता आंबेडकरांशी...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : "सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन भारिप-बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची कुवत फक्‍त प्रकाश आंबेडकर यांच्यामध्येच असल्याने एमआयएम या आघाडीत सहभागी होणार आहे,' अशी माहिती आमदार इम्तियाज जलील यांनी दिली.

आघाडीबाबतचा अंतिम निर्णय एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी व प्रकाश आंबेडकर मिळून घेणार असून, येत्या दोन ऑक्‍टोबरला त्यांची संयुक्‍त सभा होणार असल्याचेही जलील यांनी सांगितले. 

इम्तियाज जलील आणि वंचित आघाडीचे माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी आज संयुक्‍त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या वेळी जलील म्हणाले की, वंचित बहुजनांचा आजपर्यंत मतांसाठी वापर करण्यात आला. मात्र, आता या घटकांनाही वास्तवाचे भान आले आहे. नवीन समीकरणे तयार करण्यासाठी ऍड. आंबेडकर यांनी चांगली सुरवात केली आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करावे, असे खासदार ओवेसी यांचे मत आहे.  

संबंधित लेख