भूमिका समजून न घेता विरोध केला- आमदार बंब

मी शेतकरी विरोधी कसा?कर्जमाफी देण्याऐवजी, ते पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करा, ही मीकेलेली मागणी शेतकरी विरोधी कशी असू शकते. माझी भूमिका नीट समजून न घेताचमाझ्यावर टीका केली गेली. कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव,सिंचनाचे प्रश्‍न सोडवणे देखील गरजेचे आहे.-आमदार प्रशांत बंब
bumb
bumb

औरंगाबाद ः "शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका, त्यांच्या खात्यातपैसे जमा करा' अशी भूमिका मी विधानसभेत बोलतांना मांडली. या मागे माझाहेतू शुध्द व खऱ्या व गरजू शेतकऱ्यांना मदत व्हावी हाच होता.शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलणाऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होऊ नयेया प्रामाणिक इच्छेतून मी ही मागणी केली. परंतु माझी भूमिका समजून न
घेताच मला विरोध केला गेला अशी प्रतिक्रिया गंगापूर-खुल्ताबाद
मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरबोलतांना आमदार बंब यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका, त्याऐवजीप्रत्येकाच्या खात्यात रक्कम जमा करा अशी मागणी सरकारकडे केली होती. बंब
यांच्या या विधानावरून शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच
विरोधकांनी प्रचंड गदारोळ घालत बंब यांना रोखले होते. त्यांनतर राज्यभरातबंब यांच्या विरोधात निदर्शने व आंदोलन करण्यात आले. सोशल मिडियावरूनदेखील बंब यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. या सगळ्या वादावर प्रशांतबंब यांनी कन्नड येथे पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज

सरसगट कर्जमाफी दिल्यास गरजू शेतकरी यापासून वंचित राहतील, आणिशेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलणाऱ्यांचे फावेल. अनेक शेतकऱ्यांनीहात उसणे, मित्रांकडून किंवा सावकाराचे कर्ज काढले आहे. त्यांना याकर्जमाफीचा लाभ होणार नाही. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
मिळावा, त्यांच्यावर नव्याने कर्ज काढण्याची वेळ येऊ नये एवढीच आपली भूमिका होती. मुळात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा अत्यंत कमी प्रमाणात झाला आहे. कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा हा पश्‍चिम महाराष्ट्राला मिळणार आहे. कर्जमाफी देतांना बागयती आणि कोरडवाहू शेतकरी यांच्यातील फरकओळखून ती दिली गेली पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांचे कर्जही माफ होईल आणित्यांना नव्याने कर्जही मिळेल.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com