रंजनकाका तावरेंवरच मनमानी पद्धतीने टेंडर दिल्याचा आरोप

रंजनकाका तावरेंवरच मनमानी पद्धतीने टेंडर दिल्याचा आरोप

माळेगाव : ""रंजनकाका, निवडणुका जवळ आल्या म्हणून कार्यकर्ते सांभाळण्यासाठी मर्जीतल्या लोकांना मनमानीपद्धतीने टेंडर देऊ नका. कारखान्याचे पर्यायाने सभासदांचे आर्थिक नुकसान होणार असेल; तर ते कदापि सहन करणार नाही,'' अशी आक्रमक भूमिका घेत बंडखोर संचालकांनी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. तसेच टेंडर प्रक्रियेत प्रशासनाने हातचलाखी केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक बाळासाहेब तावरे यांनीही सांगितले. 

माळेगाव कारखान्याच्या आगामी ऊसगाळप हंगाम तयारीच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 11) रंजन तावरे यांच्या आधिपत्याखाली संचालक मंडळाची विशेष बैठक बोलविली होती. त्यात बगॅस, मळी, राख वाहतूक आदी कामांसह कार्यस्थळावरील वाडे उष्टाळू उचलणे आदी कामांची टेंडर प्रक्रिया प्रशासनाकडून हाताळण्यात आली.

या प्रक्रियेत वशिलेबाजी करून जवळच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न अध्यक्ष तावरे यांनी केल्याचा थेट आरोप संचालक सुरेश खलाटे, विलास देवकाते, अविनाश देवकाते, रामचंद्र देवकाते, अविनाश गोफणे आदींनी केला. त्यामुळे कार्यस्थळावर खळबळ उडाली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालकांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. 

"टेंडर दाखविली नाहीत' 
या बैठकीत आलेली टेंडर बहुतांशी संचालकांनी मागणी करूनही दाखविण्याचे धाडस रंजन तावरे यांनी दाखविले नाही व बैठक संपेपर्यंत वेळ मारून नेल्याच्या केविलवाणा प्रकार त्यांनी केला, अशी माहिती संचालक अविनाश देवकाते यांनी सांगितली. तसेच मागील बैठकीतही 24 लाख साखर बॅग (बारदाना) खरेदी टेंडर प्रक्रियेत प्रशासनाने घाईगडबड करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विरोधकांच्या सतर्कतेमुळे प्रतिबॅग 17 रुपये 25 पैसेप्रमाणे खरेदी करण्यात यश आले होते, अशी माहिती संचालक विलास देवकाते यांनी दिली. 
 
डिझेल दरवाढीमुळे यंदा ऊस वाहतुकीत 11 टक्के दरवाढ दिली. तेथे मात्र विरोधक स्वतःच्या ऊस वाहतूक गाड्या असल्याने गप्प बसले आणि प्रामाणिक काम करणाऱ्या लोकलच्या टेंडरधारकांना महागाईच्या तुलनेत काहीशी दरवाढ मिळाली, की हेच विरोधक राजकराणापायी आरडाओरडा करतात. हे कितपत योग्य आहे? साखर विक्री टेंडर अथवा साखर बॅग खरेदी असो, आम्ही नियमाचे तंतोतंत पालन करतो. त्याच पद्धतीने बगॅस, मळी, राख वाहतुकीची टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे हाताळली. संस्थेचे कसलेही नुकसान झाले नाही, असे स्पष्टीकरण रंजन तावरे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com