open to all decision | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

खुला प्रवर्ग सर्वांसाठीच खुला; समांतर आरक्षणाच्या निर्णयात सरकारचा फेरबदल 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

भरतीप्रक्रिया राबविल्यास अनेक याचिका दाखल होण्याची शक्‍यता असल्याने भरतीप्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची भीती सरकारने व्यक्‍त केली आहे.

मुंबई : समांतर आरक्षणाच्या गोंधळाने राज्यात सुरू असलेल्या सामाजिक संभ्रमावर बुधवारी राज्य सरकारने तोडगा काढला आहे. खुला प्रवर्ग हा सर्वच प्रवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी खुला असल्याचा फेरबदल सरकारने आज केला. 

ता. 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकानुसार खुल्या प्रवर्गातील जागांवर आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला गुणवत्ता असली, तरी प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसारच राज्य लोकसेवा आयोगानेदेखील पदभरतीची प्रक्रिया सुरू केलेली होती. मात्र, या परिपत्रकावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकानुसार भरतीप्रक्रिया राबविल्यास अनेक याचिका दाखल होण्याची शक्‍यता असल्याने भरतीप्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची भीती सरकारने व्यक्‍त केली आहे.

ता. 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकात बदल करताना नवीन सुधारित आदेशात सरकारने असे स्पष्ट केले आहे, की खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी. या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि. जा. भ. ज., विशेष मागास प्रवर्ग व एसईबीसी) समावेश होईल. या गुणवत्तेच्या यादीनुसारच खुल्या प्रवर्गातील पदे भरावीत. मात्र, सरकारच्या या परिपत्रकाच्या विरोधात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पेटण्याचे संकेत असून, हा सरळसरळ सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याची टीका सुरू झाली आहे. 

संबंधित लेख