राष्ट्रवादीच्या नेत्यांवर फक्त आरोप आहेत : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती टाळली. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपकडून या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर फक्त आरोप आहेत. ते सिद्ध झालेले नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांवर फक्त आरोप आहेत : चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यातच नव्हे तर देशभरातच अशी संस्कृती आहे की राजकारणात आरोप प्रत्यारोप झाले तरी चांगल्या गोष्टीत सहभागी व्हायचे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळयाचे अरोप आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. ती खंडीत होणार नाही मात्र त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला जाण्यात गैर काय आहे, असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केला.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी प्रदेश भाजपामध्ये भाजपाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पाटील बोलत होते.  राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र ते स्वतः गेले नाहीत.
स्वतः पाटील, पुरवठामंत्री गिरीश बापट आदी या कार्य़क्रमाला उपस्थित होते.

याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की राजकारणात अरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याच्या पलिकडे मैत्री असायला हवी. त्यांच्यावर सिंचन घोटाळयाचे अरोप असले तरी ते सिद्ध झालेले नाहीत. यावेळी उपस्थित असलेले मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले की या कार्यक्रमाला सर्वपक्षिय नेत्यांना निमंत्रण होते. त्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे गैर नाही.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com