केडगाव हत्याकांड : एक वर्षानंतरही तिच भीती, तोच दरारा

महाराष्ट्राला व राज्यातील राजकारणाला हादरुन सोडणाऱ्या केडगाव हत्याकांडाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या एक वर्षात केडगावात अनेक घडामोडी घटल्या. राजकीय उलतापालथी झाल्या, तरी त्या वेळी निर्माण झालेली भिती, दरारा अद्यापही कायम आहे. राजकीय कारणातून शिवसेनेच्या दोन कार्य़कर्त्यांच्या हत्येचे थरारनाट्य लोकांच्या डोळ्यापुढे अजूनही शहारे आणतात. कॅंडल मार्चच्या निमित्ताने नेत्यांच्या भाषणातून, लोकांच्या बोलण्यातून या घटनेची चीड स्पष्ट झाली.
केडगाव हत्याकांड : एक वर्षानंतरही तिच भीती, तोच दरारा

नगर : महाराष्ट्राला व राज्यातील राजकारणाला हादरुन सोडणाऱ्या केडगाव हत्याकांडाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या एक वर्षात केडगावात अनेक घडामोडी घटल्या. राजकीय उलतापालथी झाल्या, तरी त्या वेळी निर्माण झालेली भिती, दरारा अद्यापही कायम आहे. राजकीय कारणातून शिवसेनेच्या दोन कार्य़कर्त्यांच्या हत्येचे थरारनाट्य लोकांच्या डोळ्यापुढे अजूनही शहारे आणतात. कॅंडल मार्चच्या निमित्ताने नेत्यांच्या भाषणातून, लोकांच्या बोलण्यातून या घटनेची चीड स्पष्ट झाली.

महापालिकेच्या पोट निवडणुकीत केडगावसाठी निवडणूक झाली. त्या वेळी विशाल कोतकर हा काँग्रेसचा कार्यकर्ता निवडून आला. निवडणुकीच्या वादातून शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणे होतीच. निवडणुकीच्या निमित्ताने ती उफळून आली. शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची कोतकर याच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात कोयत्याने वार करून व गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या वेळी शिवसेनेच्या नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलाविले. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस घातल्याने जगताप यांच्यासह आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक होऊन काही दिवस जेलमध्ये रहावे लागले. दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या सुमारे पाचशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होवून सहा महिने अटक व सुटका हे सत्र सुरूच होते. या दरम्यान हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ, रवि खोल्लम यांच्यासह इतर आरोपी शोधून त्यांना कारागृहात पाठविण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाच धस मात्र वर्षभर केडगाव परिसरात राहिली.

अजूनही केडगावमध्ये जमिनीचे व्यवहार करण्यास लोक घाबरत आहेत. बाहेरील व्यक्ती या परिसरात घरे घेण्यास धजत नाही. काही व्यावसायिकांनी आपले व्यवसाय इतरत्र हलविले आहेत. काहींनी मिळेल त्या किमतीत घर विकून इतर भागात राहणे पसंत केले आहे. केडगावमध्ये किरकोळ भांडणे झाले, तरी मोठा दंगा झाल्याचे वातावरण तयार होते. मोठा पोलिस बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल होतो. मागील वर्षभरात एका कामगाराचा व एका युवकाचाही खून झाला. त्यामुळे दहशतीची ही मालिका अद्यापही संपली नाही. या सर्व प्रकारांमुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीनी एकट्या जाण्याचे टाळताना दिसतात. अनेक विद्यार्थीनी शिक्षणासाठी आपल्या नातेवाईकांकडे गेल्याचे उदाहरणे आहेत. एकूणच केडगावमधील भिती संपली नाही. ती वाढतच चालली आहे.

लोकसभेच्या सभा जपूनच
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या परिसरात मोठ्या सभा होताना दिसत नाही. ज्या काही होतात, त्या जपून व पोलिस बंदोबस्तात होताना दिसत आहेत. त्या फंदात न पडण्याचे उमेदवारांचे धोरण दिसून येत आहे. प्रचारफेऱ्याही मोठ्या होत नाहीत. त्यांना प्रतिसादही तितकासा मिळत नाही. महापालिकेच्या निवडणुकीत या भागातील काँग्रेसचे सर्व इच्छुक उमेदवार भाजपने पळविले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे वर्चस्व दिसत असले, तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मूळ कार्यकर्ते मात्र आपल्या तत्त्वाला धरून असल्याचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com